You are currently viewing स्मृति भाग १

स्मृति भाग १

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

*स्मृति भाग १*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
सकल जनांस आज स्मृती म्हटले की फक्त ” मनुस्मृती ” एवढेच कळते . परंतु जनांना स्मृति म्हणजे काय ? त्या किती आहेत ? त्यात काय वर्णन आहे ? याची बिलकुल माहिती नसते . आज तर बरेच ब्राह्मणही मनुस्मृतीचे विरोधात निर्लज्जतेने बोलतांना दिसतात . पण या गोष्टी काळानुसार पुढे आल्या . आज सहन होत नाही बर्‍याचजणांना व ते ह्या अवैचारिक नालायकतेचा विरोधही करतांना दिसतात . असो .
स्मृति म्हणजे स्मरण . आयुष्य जगत असतांना त्यात येणार्‍या सर्व गोष्टींचे योग्य ज्ञान व स्मरण व्हावे म्हणून स्मृति . आमच्या ऋषिंनी आकाशमण्डलात आदि अव्यक्त नादाच्या रेखा तरंगांना लहरत असतांना आपल्या योगबलाने पाहिले व त्या लहरींपासून जे अक्षर व शब्द बनले ते ईश्वरीय अनुशासनात्मक वाक्य होते .त्यास दर्शन शास्त्रात शब्दप्रमाण मानून साहित्यकारांनी ईश्वरीय वाक्ये म्हणून त्याची प्रशंसा केली . त्या अव्यक्त नादाची आपल्या स्मरणाने ऋषिंनी ह्या भूमण्डळाची मर्यादा , नैतिकता आणि व्यवहारिकता यांचे जे विस्तारपूर्वक वर्णन केले त्यास *स्मृति* हे नामाभिधान पडले . स्मृतिशास्त्रात मुख्य तीन विषयांचे निर्णय दिलेले आहेत . १)आचार, २)व्यवहार आणि ३) प्रायश्चित्त .
सभ्यता ही संस्कृति आणि असभ्यता ही विकृति . असे काही मानतात . पण सभ्यता ही नैतिक जीवनाची देणगी आहे . संस्कृति ही एकमात्र स्मृतिशास्त्राने ज्ञात होते . तदनुशासित जीवनाशिवाय सांस्कृतिक जीवनच नाही !
उच्चनीच भेदाशिवाय , लहानमोठ्या भेदाशिवाय चारही वर्ण समान आहेत व सर्व जातींचे जो आधारभूत धर्म तो आत्मनिष्ठेसमान आहे . अस्पृश्यता वास्तविक स्मृतिंची देण नसून अस्पृश्यतेचा सबंध संक्रामक रोगांशी आहे , हे आज कोरोनामुळे जास्त समजायला मदत होईल ! ” संसर्गश्चापि तैः सह । हे याज्ञवल्क्य स्मृतितील वाक्य अस्पृश्यता ही संक्रमणाने , काळाने व स्वभावाने येते , हे दर्शवते . अवस्थाभेदाने , देशभेदाने व कालभेदाने स्पृश्यता अस्पृश्यता व अस्पृश्यता ही स्पृश्यता होते . पण शारिरीक अस्पृश्यतेव्यतिरिक्त मानसिक अस्पृश्यता अधिक गम्भीर आहे . शारिरीक व मानसिक रोगांना दूर करण्याचे काम संस्कार करतात . शारिरीक व मानसिक अस्वच्छता दूर करणे , हाच स्मृति सिध्दांत आहे . म्हणून आचार , व्यवहार आणि प्रायश्चित्त यातील अस्वच्छता गेली की सांस्कृतिक जीवनाचा विकास होवून नैतिक , धार्मिक , व्यवहारिक , सामाजिक जीवनाचे श्रेय प्रत्येकजण प्राप्त करु शकतो , ही स्मृति धारणा आहे .
ब्रह्मपुराणात एक सुंदर श्लोक येतो ,
*अज्ञात्वा ग्रन्थतत्वानि वादं यः कुरुते नरः ।*
*लोभाद्वाSप्यथवा दम्भात्स पापी नरकं व्रजेत् ।।*
जी व्यक्ति ग्रन्थतत्व जाणल्याशिवाय लोभाने व दम्भाने व्यर्थ कलह करतात ते सर् नरकगामी असतात !!
म्हणून आपण स्मृतिंची नावे व अंदाजे गाभा काय ? याचा विचार माझ्या अल्पमतीने पाहणार आहोत . चुकांबद्दल आताच माफी मागतो .
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा