You are currently viewing सावरकर यांनी देश उपयुक्तततेसाठी आयुष्य वेचले – सिने अभिनेते शरद पोक्षे यांचे प्रतिपादन

सावरकर यांनी देश उपयुक्तततेसाठी आयुष्य वेचले – सिने अभिनेते शरद पोक्षे यांचे प्रतिपादन

मालवण

उपयुक्ततता वाद हा वीर सावरकर यांच्या आयुष्याचा पाया होता. मी देशासाठी उपयुक्त कसा ठरेन या विचारानेच त्यांनी आयुष्य वेचले. जेल मध्ये आयुष्य सडण्यापेक्षा देशासाठी कार्य करता यावे याउद्देशाने त्यांनी शिक्षा कमी होण्यासाठी इंग्रज सरकारला दयेचे अर्ज लिहिले. त्यांनी माफीनामा कुठेही दिला नाही. दयेचे अर्ज लिहिताना सावरकर यांना भविष्यात भारतात बिनडोक राजकारणी तयार होतील हे माहित नव्हते. आज सत्य जाणून न घेता दिल्लीतील एक वेडा पोरगा जो मोबाईलवरील एसएमएस वाचून भाषणे करतो, तो बावीस हजार पानांचे लेखन करणाऱ्या सावरकरांवर बोलत आहे, त्याची कीव येते अशी घणाघाती टीका सिने नाट्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली. श्री पोंक्षे यांनी सावरकर समजणे, तसे वागणे फारच कठीण आहे. मात्र सावरकर समजले तरच सूजाण राष्ट्राची निर्मिती होईल, असेही शरद पोंक्षे म्हणाले

मालवण येथे विश्व् हिंदू परिषद मालवण प्रखंड तर्फे मामा वारेरकर नाट्यगृहात अभिनेते शरद पोंक्षे यांचे वीर सावरकर यांच्यावरील व्याख्यान पार पडले. यावेळी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री भाऊ सामंत, अनिरूद्ध भावे, आनंद प्रभु, डॉ. सुभाष दिघे, अजित पाठक, संदीप बोडवे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ अष्टपैलु कलानिकेतनच्या गायकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विविध गीताने करण्यात आला या व्याख्यानास भाजप नेते निलेश राणे व भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.

यावेळी शरद पोंक्षे म्हणाले, दिल्लीतील एक वेडा पोरगा सावरकरांवर बोलत आहे, तो मूळ गांधी पण नाही. सत्य जाणून न घेत सावरकरांनी इंग्रजंची माफी मागितली असा अपप्रचार केला जात आहे. सावरकरांनी माझी जन्मठेप पुस्तकात दयेचे अर्ज स्वतःच लिहून ठेवले आहेत. त्यात कुठेही त्यांनी आपल्या भूतकाळातील कार्याबाबत इंग्रजांची माफी मागितलेली नाही. आणि जरी माफी मागितली असती तरी त्यांच्या आधी केलेल्या कार्याची किंमत शून्य ठरत नाही, असेही श्री. पोंक्षे म्हणाले.

माणुसकीचा धर्म म्हणजेच हिंदू धर्म होय. भारतावर अनेक आक्रमणे झाली, मात्र भारत कधीही दुसऱ्या धर्माचा देश झाला नाही, हीच हिंदूंची ताकद असून येथील हिंदू धर्म अजूनही टिकून आहे. हिंदू संपला तर सर्व संपेल, म्हणून हिंदू टिकला पाहिजे, भारत हिंदू राष्ट्र झाले पाहिजे. हिंदू राष्ट्रसाठी प्रेरित होऊन सावरकर यांनी कार्य केले. जाती पातीचा बिमोड करतानाच हिंदू धर्मातील प्रत्येक जातीचा मनुष्य हा आधी हिंदूच आहे, याच विचारातून सावरकर यांनी १९२९ साली मालवणात महार मुलांची मुंज केली होती.

आज सावरकरांबद्दल भरकटविण्याचा प्रयत्न केला जातं आहे असे सांगून ते म्हणाले, १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वांतत्र्यवीर सावरकरांनी आपल्या आयुष्याची होळी केली. अशा या भारताच्या महान सुपुत्राचा गौरव व्हायला हवा होता. परंतु काँग्रेसने गलिच्छ राजकारण करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करून त्यांचा अपमान करण्याचे काम केले. त्यामुळे सावरकर कोण होते हे सांगण्याची आज गरज निर्माण झाली आहे. ज्यांनी सावकरांची बदनामी केली. त्यांच्यासाठी सावरकर कोण होते हे आम्ही सांगतच नाही. कारण त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. आम्ही भारतातल्या लोकांना सावरकर समाजावून सांगत आहोत. कारण त्यामधूनच प्रगल्भ समाजाची निर्मिती होणार आहे. वीर सावरकर आवडणारे व मानणारे अनेक मुख्यमंत्री झाले. परंतु शासकीय पातळीवरून सावरकरांचे विचार लोकांपर्यत पोहचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर गौरवयात्रा आयोजनाच्या माध्यमातुन केले आहे. काँग्रेसचे स्वातंत्र्यवीर सावरकरांची नेहमीच अवहेलना केली. काँग्रेसकडून सावरकरांचा आजही अपमान केला जात आहे. परंतु त्या अपमानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरपणे गौरवयात्रेच्या माध्यमातून उत्तर दिल्याचे ते म्हणाले

कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी विजय केनवडेकर, ज्योती तोरसकर, विद्याधर केनवडेकर, बबन परूळेकर, पार्थ आजगावकर, नंदु फणसेकर, सुभाष कुमठेकर, सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, दत्ता सामंत, विलास हडकर, सदा चूरी,यतिन खोत, गौरव वेरलेकर, गार्गी कुशे, महादेव मालवणकर यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 6 =