You are currently viewing पुण्यातील प्रसिद्ध अशा लोकमान्य हास्ययोग संघ पुणे यांचा रौप्यमहोत्सवी विशेषांक प्रकाशित

पुण्यातील प्रसिद्ध अशा लोकमान्य हास्ययोग संघ पुणे यांचा रौप्यमहोत्सवी विशेषांक प्रकाशित

पुणे

संस्थापक अध्यक्ष कै. डॉ.सुभाष देसाई सर यांनी स्थापन केल्या *लोकमान्य हास्ययोग संघ पुणे* या उत्साही आणि नामवंत संस्थेतर्फे संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात संस्थेतर्फे या अंकाचे संपादक विद्यमान मा. शरद महाबळ व संस्थेवर आजचे अध्यक्ष मा. डॉ. प्रसाद आंबिकर यांच्या आधिपत्याखाली प्रकाशित करण्यात आले.
या सुंदर अशा अंकामध्ये सुमारे 76 प्रतिथयश विद्यमान लेखकांचे *हास्ययोग* या विषयावर अत्यन्त अभ्यासपूर्ण असे लेखांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
ते निश्चितच अत्यन्त वाचनीय आणि अनुकरणीय असे आहेत.
या बरोबरच विद्यमान अध्यक्ष मा. प्रसाद आंबिकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात या संस्थेतर्फे
आजतागायत केलेल्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतात व्यक्त केला आहे. कै. डॉ. सुभाष देसाई तसेच मा. बंडोपंत फडके सर यांचा माझा तसेच अनेक सभासदांचा वर्षांपासून प्रदीर्घ संबंध आहे आणि
याचा मला मनस्वी आनंद आहे.
संस्थेच्या संपादक मंडळातील
सौ. स्मिता मोहिते व श्रीमती कुमुद चाफेकर व सौ. दीपा पराडकर यांनी माझे घरी हा *हास्यलोक रौप्यमहोत्सवी सुंदर अंक मला माझ्या घरी येवून दिला.त्याबद्दल आम्ही उभयता त्यांचे तसेच सर्व क्लबच्या सभासदांचा आभारी आहे.
*वि.ग सातपुते.*( ज्येष्ठ साहित्यिक ).
*संस्थापक अध्यक्ष :-*
*महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे .*

प्रतिक्रिया व्यक्त करा