बांदा
केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मडुरा येथील श्री देवी माऊली कला क्रीडा व व्यायाम मंडळाच्या वतीने भव्य ‘माऊली चषक २०२३’ क्रिकेट लीग स्पर्धेचे ६ ते १० एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब व सरचिटणीस विशाल परब यांनी पुरस्कृत केली आहे.
सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५० हजार रुपये, द्वितीय २५ हजार रुपये तसेच अनेक वैयक्तिक पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार ६ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता विशाल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच १० एप्रिल रोजी भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. सदर स्पर्धा मडुरा काळा आंबा येथील भूतनाथ मैदानावर होणार आहे. एक गाव एक संघ या संकल्पनेवर सदर स्पर्धा होईल.