You are currently viewing ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालकांना (Data Operator) गेले ३ ते ४ महीने मानधनच नाही

ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालकांना (Data Operator) गेले ३ ते ४ महीने मानधनच नाही

२० संगणक परिचालकांनी केली मालवण मनसेकडे तक्रार

संगणक परिचालकांना त्वरित मानधन अदा करा- इब्रामपूरकर, सांडव

मनसे शिष्टमंडळाने मालवण पं.स.गटविकास अधिकार्‍यांची घेतली भेट

८ दिवसात मानधन खात्यावर जमा करण्याचे शिष्टमंडळाला दिले आश्वासन 

असा प्रकार पुन्हा होवू नये म्हणून खास बाब म्हणून वेळीच उपाययोजना करा असा आदेशच ग्रामपंचायतींना काढणार असल्याचे केले स्पष्ट

मालवण

‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना दाखले देण्याची सेवा देणारे संगणक परिचालक (Data Operator)करत असतात.शासनाच्या ऑनलाइन सुविधेमध्ये संगणक परिचालक (Data Operator) हा महत्त्वाचा दुवा मानला जातो परंतु अनेक महिने संगणक परिचालकांना (Data Operator) देण्यात येणारे वेतन दिले गेलेच नाही
याबाबत अधिक वृत्त असे की २० जणांच्या सह्या असलेले निवेदन संगणक परिचालकांनी मालवण तालुका मनसेकडे दिले होते.
या निवेदनाची दखल घेत मालवण मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद सांडव व उपतालुकाध्यक्ष उदय गावडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, महिला शहरअध्यक्षा भारती वाघ, महिला उपतालुकाध्यक्षा राधिका गावडे, उदय गावडे, नंदकिशोर गावडे, उपशहरअध्यक्ष विशाल ओटवणेकर, मनविसे उपतालुकाध्यक्ष संकेत वाईरकर, मनविसे शहरअध्यक्ष साईराज चव्हाण, विजय गावडे, दिनेश कदम, सचिन गावडे, सुशील चव्हाण, दत्तराज चव्हाण, सिद्धेश मयेकर, रेकी फर्नांडिस आदी उपस्थित होते.
शिष्टमंडळाच्यावतीने मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी संगणक परिचालकांची बाजु मालवण पंचायत गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांचेकडे मांडली. संगणक परिचालक हे प्रामाणिकपणे ग्रामपंचायत कार्यालयात काम करत असतात.शासन 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीकडे निधी जमा होतो.जमा झालेला निधी सदर ग्रामपंचायत आपले सेवा केंद्राच्या ठेकेदाराकडे संपूर्ण एका वर्षाचे प्रती महिना १२३३१/- प्रमाणे १,४७,९७२ /- आपले सेवा केंद्राकडे म्हणजेच ठेकेदाराकडे जमा करते.या ठेकेदाराकडे संगणक खर्च,प्रिंटर खर्च,स्टेशनरी,सॉफ्टवेअर खर्च व इतर खर्च या ठेकयात नमूद असल्याने ६००० रुपये प्रती महिना एवढेच तुटपुंजे मानधन देतो.परंतु हे मानधनही देण्यास ठेकेदार टाळाटाळ करत आहे. ३ ते ४ महिने मानधनच दिले गेले नाही.अनेक संगणक परिचालक आपले कुटुंबाचे चरितार्थ या मानधनावर चालवतात. आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना कालावधीत सुद्धा लोकांची,शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून निमूटपणे काम करत आहे असे सांगत गटविकास अधिकार्‍यांचे लक्ष वेधले.

मालवण गटविकास अधिकार्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

मनसेच्या शिष्टमंडळाला मालवण गटविकास अधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ८ दिवसाच्या आत संगणक परिचालकांना त्यांचे मानधन अदा केले जाईल असे सांगितले. तसेच मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतीना संगणक परिचालकांचे मानधन वेळेत देण्यासाठी खासबाब म्हणून उपाययोजना करा अश्याप्रकारचा आदेश दोन दिवसात मालवण पंचायत समितीकडून देण्यात येईल असे सांगत संगणक परिचालकांच्या विविध मागण्या रास्त असून त्यासंदर्भात सरकार दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचेही मनसे शिष्टमंडळाला सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =