You are currently viewing कळणे ग्रामस्थांनी पुकारलेले आक्रोश आंदोलन अखेरीस मागे..

कळणे ग्रामस्थांनी पुकारलेले आक्रोश आंदोलन अखेरीस मागे..

नुकसानग्रस्तांना न्याय देऊन भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न करू; खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांचे आश्वासन

 

दोडामार्ग :

 

कळणे येथील सबंधित नुकसान ग्रस्तांना न्याय देण्यात येईल, त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन खणिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी दिल्यानंतर मनसेचे युवा कार्यकर्ते अभय देसाई व कळणे ग्रामस्थांनी पुकारलेले आक्रोश आंदोलन अखेरीस मागे घेण्यात आले.

याबाबत सबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी श्री. पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली यावेळी. यावेळी झालेल्या चर्चेत आम्ही संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू त्यादृष्टीने पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी अधिकारी पाटील यांनी दिले. त्यामुळे आक्रोश आंदोलनाचा इशारा मागे घेण्यात आला आहे.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, जिल्हा संघटक अमोल जंगले, उपजिल्हा संघटक अभय देसाई, कुणाल किनलेकर, विशाल वोटवणेकर, संदेश शेट्टी, संदीप लाड, आबा चिपकर, निलेश देसाई, नाना देसाई आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा