महिलांची आयपीएल तीनच संघांत होणार?

महिलांची आयपीएल तीनच संघांत होणार?

आयपीएलच्या 14व्या हंगामात महिलांची आयपीएल ही चार संघांमध्ये होईल, असे ‘बीसीसीआय’ने जाहीर केले होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे यंदाही तीनच संघांमध्ये महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे आयपीएल स्पर्धा लांबणीवर पडून अखेर ती सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान यूएईमध्ये पार पडली. या स्पर्धेतही सुपरनोवाज, वेलोसिटी व ट्रेलब्लेजर्स या तीनच संघांमध्ये महिलांची आयपीएल स्पर्धा रंगली होती. 2021च्या आयपीएलमध्ये महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत आणखी एक संघ वाढविण्याची ‘बीसीसीआय’ची रणनीती होती. मात्र कोरोनामुळे या वेळीही चार महिला संघांची ही स्पर्धा होणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.

पूर्वीच्याच तीन संघांमध्ये नवी दिल्लीत महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. 16 एप्रिलला ‘बीसीसीआय’च्या होणाऱया बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

.

प्रतिक्रिया व्यक्त करा