You are currently viewing अनंत पिळणकर यांचा ३ एप्रिल ला वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

अनंत पिळणकर यांचा ३ एप्रिल ला वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

प्रमुख अतिथी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत

कणकवली
राजकारण समाज हितासाठी हक्काचा माणूस अशी ओळख असणारे अनंत पिळणकर यांचा वाढदिवस सोमवारी ३ एप्रिला फोंडाघाट येथे कार्यकर्ते आणि त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.

या अभिष्टचिंतन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अनंतभाई मित्र मंडळाने केले आहे.

प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत उपस्थित राहणार आहेत.
वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक जाणवेतून मारूती मंदिराच्या परिसरात स्वच्छता अभियान व रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
रक्तदान शिबीर  सकाळी १ ते दुपारी २ पर्यंत पार पडणार आहे. सायंकाळी केक कापून वाढदिवस अभिष्टचिंतन, त्यानंतर रात्री स्नेह स्नेहभोजन असणार आहे. तरी या अभिष्टचिंतन सोहळ्यास आपली सर्वाची उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आवाहन अनंतभाई मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा