You are currently viewing तळेरे हायस्कूल सहलीच्या विद्यार्थ्याना सिंधुदूर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पुणे यांची भेट

तळेरे हायस्कूल सहलीच्या विद्यार्थ्याना सिंधुदूर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पुणे यांची भेट

तळेरे हायस्कूल सहलीच्या विद्यार्थ्याना सिंधुदूर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पुणे यांची भेट

*सर्व विद्यार्थ्यांच्या खाऊ वाटप व नाश्ता ची केली व्यवस्था*

*सिंधुदूर्गमधून नोकरी शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना दिशादर्शक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पुणे* – श्री अजय पाताडे

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, तळरे, जिल्हा सिंधुदुर्ग यांची शैक्षणिक सहल पुणे जिल्हामध्ये दोन दिवसांसाठी आलेली होती. पहिल्या दिवशी प्रतिबालाजी, सिहंगड, दगडूशेठ हलवाई गणपती, शनिवार वाडा, लाल किल्ला याठिकाणी भेट देऊन रात्री मुक्कामासाठी सर्व पाचवी ते बारावीच्या विद्यार्थांसह शिक्षकवृंद श्री क्षेत्र देवाची आळंदी येथे विश्रांती साठी थांबून दुसऱ्या दिवशी आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीच दर्शन, देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या समाधीच दर्शन, गाथा मंदिर,शिवनेरी किल्ल्याला भेट देऊन परतीचा प्रवास करणार होते. पुणे जिल्हातील पिंपरी चिंचवड येथील कार्यरत असणारे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे कार्यकर्ते रुपेश काणेकर यांचेमार्फत अध्यक्ष श्री अजयजी पाताडे यांना याची बातमी मिळताच आपण सर्व पुण्यातील कार्यकर्त्यांनी मिळून आपल्या गावाकडून आलेल्या मुलांना सदिच्छा भेट देऊन त्यांच्यासाठी खाऊ वाटप करूया असे सुचविण्यात आले. ठरल्याप्रमाणे मुलं व शिक्षक ज्या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले त्या जगताप मठ, देवाची आळंदी येथे भेट देऊन सर्व मुलांसोबत हितगुज करून त्यांना अल्पोपहार तसेच आठवण म्हणून पेन वाटप करण्यात आले. त्याचबरोबर सर्व शिक्षक, वाहनचालक यांना शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन या पुण्यनगरित छोटेखानी आदरातिथ्य करण्यात आले. तसेच सन्माननीय किशोरभाऊ आहिरे, भाजपा उपाध्यक्ष पुणे जिल्हा यांच्यामाध्यमातून सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आली . त्यांचाही यावेळी शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी अजयजी पाताडे व किशोरभाऊ आहिरे यांनी सर्व मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले व भविष्यात उच्चशिक्षण घेण्याकरिता किंवा नोकरी व्यवसाय शिक्षणाच्या निमित्त जेव्हा आपण पुणे शहरात याल त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ आपल्या सर्वांच्या अडिअडचणी मध्ये खंबीरपणे पाठीशी उभे राहील याची ग्वाही दिली.
यावेळी वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या वतीने चंद्रकांत काटे (जेष्ठ शिक्षक ), धनलक्ष्मी तळेकर , आशा कानकेकर , संस्कृती पडवळ , पी एन काणेकर , विनायक टाकळे , अनंत कोकरे , सुचिता सुर्वे , नम्रता गावठे , शितल जाधव , रोहिणी जाधव , निकिता तर्फे , सर्व विद्यार्थी वर्ग तसेच वाहन चालक शिवराम राणे, सतीश माने, तुषार हडकर हे उपस्थित होते . त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने अध्यक्ष आदरणीय अजयजी पाताडे यांच्यासह मनाली पाताडे, पराग पालकर, संजय सावंत, सुनिल साळसकर, अमोल चव्हाण, नरेंद्र धुरी, बाळकृष्ण गुरव, विठ्ठल परब, रुपेश काणेकर, कृष्णा गवस, प्रतिप उमळकर हे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले. सूत्रसंचालन श्री रुपेश काणेकर , संजय सावंत यांनी केले तसेच श्री काटे सर यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा