तळेरेतील महेश तळेकर यांचे निधन…

तळेरेतील महेश तळेकर यांचे निधन…

तळेरे

तळेरे गावठण येथील महेश भाष्कर तळेकर वय ४८ यांचे अल्पशा आजाराने सोमवारी पहाटे निधन झाले.
सर्वांशी हसतमुख आणि सहकार्य वृत्तीमुळे ते सुपरिचित होते.
त्यांच्या लाघवी स्वभावामुळे त्यांचा मोठ्ठा मित्र परिवार आहे.तळेरे येथील स्व.सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट तळेरे व स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबविण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
सहकारी वृत्तीमुळे ते सर्वांना आपलेसे वाटायचे.
तळेरे बसस्थानकावर येणा-या प्रवाशांना नेहमीच मदत करत असत. तळेरे येथील समाजसेवक स्व. सुनिल तळेकर,ट्रष्टचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त ग्रामसेवक सुरेश तळेकर आणि उद्योजक हनुमंत तळेकर यांचे ते भाऊ होत.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला. सातत्याने अनेकांशी संवाद करत असल्याने कोणत्याही विषयावर ते अत्यंत अभ्यासपूर्ण बोलत होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच तळेरे बाजारपेठ आणि रिक्षा बंद ठेऊन त्यांना श्रध्दाजली वाहण्यात आली.
त्यांच्यावर तळेरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, आई, भाऊ, वहिनी असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा