शिंदे सरकारकडून तात्काळ मान्यता मिळून निधी उपलब्ध
कणकवली
गणपती मंदिर(फटकुर माळी)ते मुरडवेवडी रस्त्याचा सर्व्हे आज दिनांक 1एप्रिल रोजी करण्यात आला, हे अंतर ३किलोमीटर व ३००मीटर असून मुख्यमंत्री सडक योजना यातून घेण्यात आले आहे.यासाठी एकनाथ शिंदे साहेब व फडणवीस सरकारने तात्काळ मान्यता देवून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.यासाठी आमदार श्री.नितेश राणे साहेब व श्री.संदेश सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी विशेष प्रयत्न केले. सर्व भिरवंडे ग्रामस्थांना विश्वासात घेवून व त्याच्या सूचनांचा विचार करून हे काम केले जाईल.
तसेच रामेश्वर मंदिराच्या समोर काँक्रिट रस्ता करण्याचा प्लॅन आहे.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.संदेश सावंत, उपजिल्हाप्रमुख शिवसेना श्री. महिंद्र सावंत , भिरवंडे सरपंच श्री.नितीन सावंत, प्रकाश घाडीगावकर, सुनील सावंत,कांता सावंत, दाजी दळवी,संतोष सावंत , विजय पटेल विनय सावंत, सर्व्हे टीम व ग्रामस्थ उपस्थित होते