You are currently viewing मुख्यमंत्री सडक योजनेतर्गत गणपती मंदिर(फटकुर माळी)ते मुरडवेवडी रस्त्याचा सर्व्हे पुर्ण 

मुख्यमंत्री सडक योजनेतर्गत गणपती मंदिर(फटकुर माळी)ते मुरडवेवडी रस्त्याचा सर्व्हे पुर्ण 

शिंदे सरकारकडून तात्काळ मान्यता मिळून निधी उपलब्ध

कणकवली

गणपती मंदिर(फटकुर माळी)ते मुरडवेवडी रस्त्याचा सर्व्हे आज दिनांक 1एप्रिल रोजी करण्यात आला, हे अंतर ३किलोमीटर व ३००मीटर असून मुख्यमंत्री सडक योजना यातून घेण्यात आले आहे.यासाठी एकनाथ शिंदे साहेब व फडणवीस सरकारने तात्काळ मान्यता देवून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.यासाठी  आमदार श्री.नितेश राणे साहेब व श्री.संदेश सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी विशेष प्रयत्न केले. सर्व भिरवंडे  ग्रामस्थांना विश्वासात घेवून व त्याच्या सूचनांचा विचार करून हे काम केले जाईल.

तसेच रामेश्वर मंदिराच्या समोर काँक्रिट रस्ता करण्याचा प्लॅन आहे.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.संदेश सावंत, उपजिल्हाप्रमुख शिवसेना श्री. महिंद्र सावंत , भिरवंडे सरपंच श्री.नितीन सावंत, प्रकाश घाडीगावकर, सुनील सावंत,कांता सावंत, दाजी दळवी,संतोष सावंत , विजय पटेल विनय सावंत, सर्व्हे टीम व ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =