You are currently viewing रामायणातील एक व्यक्तिरेखा…..लक्ष्मण…!

रामायणातील एक व्यक्तिरेखा…..लक्ष्मण…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललित लेख*

*रामायणातील एक व्यक्तिरेखा…*
*…लक्ष्मण…!*

सगुण आणि निर्गुण ही ईश्वर भक्तीची दोन रूपे…देवाला दोन्हीही प्रिय आहेत…रामायणातील लक्ष्मण हा सगुण भक्तीचा तर भरत निर्गुण भक्तीचा उपासक होता. भक्ती जर का निस्वार्थी असेल तर देवाला प्रेमाने घातलेली साद देखील देवाजवळ पोचतेच…मग भक्ती सगुण असो वा निर्गुण…! स्थिर मूर्तिमंत रूप हे सगुण भक्तीचे द्योतक तर शक्तीची जाणिव ठेवणे अन् अनुभूती घेणे ही निर्गुण भक्ती…!
श्रीरामांना वनवासाची शिक्षा मिळाल्यानंतर लक्ष्मणाशी लग्न करून मेंदीच्या कोमल पावलांनी माप ओलांडून कुंकवाच्या पायांचे ठसे उमटवित नव्या संसाराची सुखं डोळ्यात माळून रघुकुलात आलेली नववधू उर्मिला अन् आपल्या जन्मदात्या आई वडील, भावंडांचा विचार न करता लक्ष्मण हट्टानेच ज्येष्ठ बंधू श्रीरामांच्या सोबत वनवासाला जायचा निश्चय करतो…कारण रामसेवेत त्याला खंड पडू द्यायचा नव्हता…
खरं सांगा….
असं भातृप्रेम आपण पाहिले का कुठे…?
एवढं सोपं असतं का भावासाठी तरी स्वतःच्या संसार सुखाचा त्याग करणे…? देहाचे विकार…वासना, लोभ आदी वृत्तीचा त्याग करणे…?
केवळ अन् केवळ पूर्णवेळ रामसेवा करण्यासाठी लक्ष्मणाने ऐहिक सुखे त्यागली…हीच होती लक्ष्मणाची सगुण भक्ती…! अयोध्या सोडताना भरत, शत्रुघ्न अयोध्येत नव्हते…तरीही आपल्या आई वडिलांची काळजी घेण्यास पत्नी उर्मिलाला सांगून लक्ष्मण रामासोबत वनवासाला निघाला… असं म्हणतात की, आपली चौदा वर्षांची झोप सुद्धा त्याने उर्मिलेला दिली होती….काय तो त्याग…काय ते दातृत्व…!
लक्ष्मणाचे आपल्या भावावरील प्रेम कधीही लपून राहिले नव्हते… रामासाठी लक्ष्मणाने केलेला त्याग लोकांच्या नजरेत भलेही भरला नसेल परंतु तो किंचितही कमी लेखण्यासारखा नव्हता…! लक्ष्मण स्वभावाने रागीट…परंतु रामाची आज्ञा त्याला शिरसावंद्य…!
वनवासातील अखेरच्या दिवसात पंचवटी येथे गोदावरी नदीच्या काठावरील अवर्णनीय निसर्ग सौंदर्याने सीतेला मोहून टाकले. अशा नितांतसुंदर आणि प्रसन्न जागी आपली छोटीशी झोपडी उभारा अशी इच्छा तिने पतिराजांकडे व्यक्त केली… तिघेही तिथे झोपडीत राहू लागले. सिताहरण करण्यासाठी रावणाने मारीच राक्षसाला मायावी सोनेरी हरणाचे रुप घेऊन झोपडी समोर पाठविले. ते सोनेरी हरीण पाहून सीतेने त्या हरिणासाठी हट्ट धरताच पत्नी हट्ट पुरविण्यासाठी राम हरिणाला पकडायला गेले. परंतु जाताना वहिनीच्या रक्षणाची जबाबदारी लक्ष्मणा वर सोपवली होती. बराचवेळ राम न आल्याने सीतेने लक्ष्मणाला भावाच्या मदतीेसाठी जाण्याचे फर्मान सोडले…लक्ष्मणने झोपडीच्या भोवताली एक रेषा मारली अन् ती कोणत्याही कारणाने ओलांडायची नाही असे सीतेला सांगितले. परंतु सन्यासी भिक्षेकरी रुपात आलेल्या कपटी रावणाने “दान द्यायचेच असेल तर झोपडीच्या बाहेर येऊनच दान दे” असे सांगत सीतेचे हरण केले.
या गोष्टीतून बोध न घेता आपणही आजच्या युगात सोन्याचे हरीण असो वा सोन्याचे आमिष दाखवणारी व्यक्ती…त्याला भुलून चुकीचे पाऊल उचलतो आणि शेवटी पश्चात्ताप करतोच… लक्ष्मणाने मारलेली ती “लक्ष्मणरेषा” जर का सीतेने ओलांडली नसती तर रामायण घडलेच नसते… कारण रावण लक्ष्मणरेषा पार करू शकत नव्हता… एवढी ताकद लक्ष्मणने मारलेल्या “लक्ष्मण रेषेत” होती… लक्ष्मण तेव्हाही आपल्या बंधुरायांचा आदेश पाळून झोपडी सोडून जायला तयार नव्हताच….अन् प्रभू श्रीरामांनी गर्भवती असलेल्या सीतेला एकटीला वनात सोडण्याची आज्ञा केली ती देखील मनावर दगड ठेऊन त्याने पाळली होती…! भावाला आदर्श मानून त्याच्या मागे सदैव उभे राहणे…त्याच्या पाउलांवर पाऊल ठेवून त्याच्या आदर्शांवर चालणं एवढं सोपं असतं का…? पण लक्ष्मणाने हे सर्व केलं…कारण तो रामभक्त होता…! लक्षण देखील रामा इतकाच शूर पराक्रमी होता… लहानपणापासून तो रामासोबतच वाढला, शिकला…श्रीरामाचा भाऊ म्हणजे प्रराक्रमी असणारच ना…!
रामाने महापराक्रमी रावण आणि कुंभकर्णाचा वध केला होता…परंतु इंद्रजित या रावण पुत्राचा वध मात्र लक्ष्मणाने केला…
का…?
रामाला इंद्रजितचा वध का करता आला नाही…?
केवळ सामर्थ्य असलं म्हणून हवं ते साध्य करता येत नाही…तर सामर्थ्याला जोड असावी लागते ती साधनेची…! साधना म्हणजे अग्नीपरिक्षाच…! एक दिवसाचा उपवास करून देवावर आपल्या अपेक्षांचे ओझे ठेवणारा मानव लक्ष्मणा सारखी कठोर साधना करूच शकत नाही… स्वप्नात देखील ध्येय पूर्तीपेक्षा कुणाच्या तरी आठवणीत गुंग होणारा…स्वप्नील सुखात रममाण होणारा मानव सौंदर्यवती स्त्री समोर असताना नजर झुकवून राहील का…? लक्ष्मणाने तो संयम आपल्या मनावर…नजरेवर ठेवला होता…वासनेवर विजय मिळविला होता…
साधनेनेच प्राप्ती होते ती असाधारण सामर्थ्याची… असाध्य ते साध्य करण्याची अद्भुत शक्ती मिळते… बळ मिळते…! लक्ष्मणाने देखील साधना केलेली … तपश्चर्या केलेली… चौदा वर्षे निद्रा न घेता श्रीराम आणि सितामाईच्या रक्षणासाठी जागला होता… चौदा वर्षे त्याने उपवास केलेला… काहीही खाल्ले नव्हते…. की त्याने चौदा वर्षे कुणा स्त्रीचे मुख दर्शन घेतले नव्हते….!
युद्ध संपवून राम लक्ष्मण सीता अयोध्येला परत येतात तेव्हा अगस्ती ऋषी रामाला भेटावयास येतात. युद्धाचे इतिवृत्त सांगताना राम म्हणाले…रावण आणि कुंभकर्णाला मी मारले, परंतु इंद्रजितचा वध लक्ष्मणने केला… त्यावर ऋषी अगस्ती श्रीरामाला म्हणाले की, “केवळ अशीच व्यक्ती इंद्रजितचा वध करू शकत होती…जी चौदा वर्षे झोपली नाही, जेवली नाही, की परस्त्रीचे मुखही पाहिले नाही…आणि ती साधना केली होती तो म्हणजे लक्ष्मण…!”.
श्रीराम देखील आश्चर्यचकित होऊन लक्ष्मणाकडे पाहतात अन् लक्ष्मणाला जेवणासंबंधी प्रश्न करतात तेव्हा लक्ष्मण म्हणतो…
बंधू, आपण फळं खाताना आपला व सितामाईचा वाटा घेऊन म्हणायचा की, “लक्ष्मणा, हा वाटा बाजूला ठेव…परंतु तुम्ही मला “खा” असं कधीही म्हणाला नाहीत…आपली खाण्याची आज्ञा नसल्याने मी कसे काय अन्न ग्रहण करू शकणार…?
आपले आणि सीता मातेचे रक्षण करणे माझे कर्तव्य असल्याने, आपण झोपल्यावर मी बाहेर पहारा देत असायचो, त्यामुळे झोपलो नाही…
मी कधीही कुणा स्त्रीच्या मुखाकडे पाहिले नाही…सीतामाईंशी बोलताना माझी नजर त्यांच्या पायाकडेच असायची… म्हणून तर सुग्रिवने आणलेल्या सितामाईंच्या दागिण्यातील मी फक्त त्यांच्या पायीची पैंजण ओळखली…!”
हे ऐकून आपल्यावरील भावाच्या प्रेमाने श्रीराम देखील भारावून गेले होते…रामायणात हनुमान जसा रामभक्त आहे…तसाच लक्ष्मण देखील श्रीरामाचा परमभक्त होता.
अयोद्धेहून परत आल्यावर रामाने अयोध्येचा राजकारभार पाहण्यास सुरुवात केली…रावणाच्या कैदेत राहून आल्याने सीतेबद्दल प्रजेमध्ये सीता अपवित्र आहे असे विविध अंगाने बोलणे सुरू झाल्यावर सीतेला अग्नीपरिक्षा द्यावी लागली… अग्नीपरिक्षा दिल्यावरही सीतेबद्दल अफवा पसरू लागल्या…तेव्हा व्यथित झालेल्या रामाने आपल्या प्राणप्रिय पत्नीला जंगलात सोडण्याची जबाबदारी देखील लक्ष्मणावर दिली. तिथे तिने वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात लव कुश अशा दोन पुत्रांना जन्म दिला. रामाने राजसूर्य यज्ञ केला तेव्हा लव कुश यांनी रामायणाचे गायन केले. आपल्या पुत्रांच्या मुखातून बाहेर पडलेले सुश्राव्य बोल ऐकून श्रीरामांना गहिवरून आल… आपल्या चुकीची जाणिव झाली. त्यांनी सीतेचा पुन्हा स्विकार करण्याविषयी ऋषिंकडे विचारणा केली…परंतु त्यावेळी सीतेने देहत्याग करण्याची इच्छा व्यक्त करून “माते, आपण पवित्र असेन, श्रीरामाशिवाय कुठल्याही पर पुरुषाचा आपल्याला स्पर्श झाला नसेल…सतित्व भंग केलं नसेल तर तू मला तुझ्यात सामावून घे…” अशी धरती मातेला प्रार्थना करताच… धरती फाटते अन् सीता त्यात सामावून जाते….! याहून वेगळी काय प्रचिती द्यायची एका स्त्रीने…? पतिव्रता सीतेला सत्व परीक्षा देताच धरती मातेने तिला आपल्या कुशीत सामावून घेतलेले वाचून देखील आजही स्त्रीला आपल्या पावित्र्याची सत्वपरीक्षा द्यावी लागते हे स्त्री जातीचे दुर्भाग्य नव्हे का..?
अवतारांची वेळ संपायला येते तेव्हा रामाला भेटायला काळदेव येतात… रामाशी एकांतात बोलण्याची इच्छा व्यक्त करून…आपली चर्चा दोघांतच असेल तेव्हा चर्चेच्या मध्ये कोणी आल्यास त्याला देहदंड देण्याची अट घालतात. श्रीरामाने लक्ष्मणाला तेव्हाही द्वारावर पहाऱ्याकरिता ठेवले… आणि कोणालाही चर्चा सुरू असताना आत सोडू नये अशी आज्ञा केलेली असते. त्याचवेळी ऋषी दुर्वासा राजमहालात प्रवेश करतात अन् थेट श्रीरामांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात येऊन राम भेटीची इच्छा व्यक्त करतात. लक्ष्मण त्यांना अडवितो तेव्हा दुर्वासा ऋषी क्रोधित होऊन त्याला श्राप देण्याची भीती दाखवतात… आपण दुर्वासा ऋषींना आत सोडले तर त्यांना देहदंडाची शिक्षा होईल म्हणून स्वतः लक्ष्मण श्रीरामांना बाहेर दुर्वासा ऋषी आल्याचे वृत्त देण्यासाठी आत जातो. त्यावेळी चर्चेत खंड पडल्याने काळदेव संतप्त होऊन रामाला आपले वचन पाळण्यास सांगतात….
रामाने आपण दिलेल्या वचनानुसार लक्ष्मणाचा परित्याग केला… परित्याग करणे म्हणजे त्याला मारण्यासारखेच होय…! आयुष्यभर आपला ज्येष्ठ बंधू म्हणजेच ईश्वर मानून रामसेवा हेच कर्तव्य समजून रामाच्या सावली पेक्षाही जास्त काळ रामासोबत घालवलेला लक्ष्मण रामाने परित्याग केल्यावर अतीव दुःखी होतो अन् शरयू नदीच्या डोहात खोलवर पाण्यात जातो…आपले मानवी रूप त्यागून भगवान विष्णूच्या अनंत शेषनागाचे मूळ रूप धारण करतो…!
प्रभू राम म्हणजेच विष्णू अवतार… सीते पाठोपाठ लक्ष्मणाच्या वियोगानंतर दुःखी झालेले प्रभू राम पुत्र लव कुश यांच्या हाती अयोध्या सोपवून शरयू नदीच्या पात्रात आपले प्राण त्यागून मूळ भगवान विष्णूचे रूप धारण करून अनंत शेषनागावर पहुडतात…!
इथेही एका प्रश्नाचं उत्तर सहजच सापडतं….
लक्ष्मणाने प्रथम देह का त्यागला असेल…?
त्याचे कारण म्हणजे…
ज्या अनंत शेषनागावर भगवान विष्णू पहुडतात त्या आदी अनंत शेषनागानेच लक्ष्मण रुपात अवतार घेतला होता. आपला अवतार संपविताच भगवान विष्णूंना त्यांच्या जागी अनंत शेषनाग दिसणे अपेक्षित होतेच….ज्यावर निद्रावस्थेत पहुडून ते विश्वाचे मंथन करतील…
अलिकडच्या काळात पुत्र मातापित्यांच्या…भाऊ भावाचा विचार करत नाही….नाती नात्यांना परागंदा होतात… गंधाळणाऱ्या फुलांचा सुगंध लुटून… चुरगळून फेकून द्यावे…तशी जन्मापासून सोबत असलेली रक्ताची नाती सुद्धा भावभावनांचे पाश तोडून दूर जातात…
त्यांच्यासाठी लक्ष्मण आणि त्याच्या बंधू प्रेमाची… नात्यांची विण हे सगुण भक्तीचे अलौकिक उदाहरणच…!
रामाच्या पादुका सिंहासनावर विराजमान करून तब्बल १४ वर्षे राज्यकारभार हाकणाऱ्या राजा भरताच्या निष्ठेचे, बंधू प्रेमाचे कौतुक आपण सर्वच करतो…परंतु केवळ रामसेवा, रामभक्तीसाठीच जन्म घेणाऱ्या अन् रामाच्या म्हणजेच स्वतःच्या भावाच्या आदेशानेच मरण स्विकारणाऱ्या लक्ष्मणाचा त्याग किती मोठा असेल…?
राम अन् लक्ष्मण प्रेमाचा हा गंध जणू सुकल्यावरही सुगंधित राहणाऱ्या बकुळ फुलासारखा चिरकाल स्मरणात राहणारा असाच आहे…!

*© दीपी [दीपक पटेकर]*
सावंतवाडी
८४४६७४३१९६

_______________________________
*संवाद मिडिया*

*🚩🚩 गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्पेशल ऑफर.!🚩🚩*

*🥳 FREE… FREE… FREE…! 🥳*

*🎼🎼 म्युझिक कॉर्नरची 🎼🎼*
*||गुढी पाडवा स्पेशल ऑफर||*

*🥵कडक उन्हाळ्यात ‘गारवा’ म्युझिक कॉर्नरचा !🥶*

*🖥️ LED TV खरेदीवर कुलर एकदम *फ्री…फ्री…फ्री‌‌…!*💾*

*🎛️ म्युझिक कॉर्नर*🎛️
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*🖥️ LED TV खरेदीकरा आणि मिळवा बजाज कंपनीचा 8000 किंमतीचा कुलर FREE तेही वॉरंटी सहित*💾*

*🌀BAJAJ FINSERV*
*0% शुन्य टक्के व्याजदर*

🔹 *19,990 मध्ये 43 Inch Smart TV 🖥️+ Bajaj Air Cooler💾*

🔹 *11,990 मध्ये 32 Inch Smart TV 🖥️ Bajaj Air Cooler💾*

*🔷SAMSUNG 🔶LG 🔷Realme 🔶 SONY 🔷Itel 🔶Aiwa 🔷Vu 🔶Haier 🔷Panasonic. 🔶MI 🔷1+ ONEPLUS*

*आदि ब्रॅण्डेड कंपनीचे प्रोडक्ट्स.*

*संपर्क*
*📲 9579273091/ 8799978651*

*पत्ता : दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

🔶 *25,999 चा ब्रॅण्डेड VU 43″ ANDROID LED TV खरेदीवर मिळवा Morphy Richards कंपनीचा 13000 किमतीचा OTG*
*FREE…FREE…FREE…*
*(3 वर्षांचा वॉरंटीसह)*
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
*📱जुना मोबाईल द्या, नवा घेऊन जा…!📲*

*😍25 %Off*
*SPECIAL DISCOUNT*

*💁🏻‍♂️कोणत्याही स्मार्ट फोनवर 25% च्या वर भरघोस सुट*

*🙏स्वप्न तुमचं, फायनान्स आमचं 🙏*
*📌0% BAJAJ FINASERY*
*📌SAMSUNG Finance+*

*🎁स्मार्ट फोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू🎁*

*💸CASH BACK Up To 7000/-*

*♦️Up To 60% Off ON Mobile Assessories*

*📲संपर्क: 8799978651*

*पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जयप्रकाश चौक, सावंतवाडी*

*🌐Advt Web link*

———————————————

*आग्रहाचे निमंत्रण…..*

*💎जुन्या अनुभवाची नवी सुरुवात*💎

*सावंतवाडीतील एक विश्वसनीय ठिकाण*

*_✡️ पी.एस.चोडणकर ज्वेलर्स*_✡️

*🎊 शुभारंभ सोहळा 🎊*

🎀 *राम नवमीच्या शुभमुहूर्तावर* 🎀

*✨गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी✨*

🌟 *सायंकाळी 5 वा*🌟

*👩‍👩‍👧‍👧आपण सर्वांनी उपस्थित राहून आमचा आनंद व्दिगुणीत करावा*

*_✡️ पी.एस चोडणकर ज्वेलर्स*_ ✡️

*💫20%OFF on making💫*

*📱संपर्क 8989020270*

*आमचा पत्ता👇*
*दुकान क्रमांक 22-23-24 वरचा तळमजला,*
*दत्तात्रय निवास, तारा हाॅटेल समोर उभाबाजार,*
*सावंतवाडी, सिंधुदुर्ग 416510*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा