*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री सौ.सीमा शास्त्री मोडक लिखित अप्रतिम लेख*
*आला उन्हाळा जीवन (पाणी) सांभाळा*
सख्यांनो उन्हाळ्याची चाहूल यंदा लवकरच लागली. आणि पाहता पाहता सूर्यनारायणाने संपूर्ण वातावरणावर स्वतःचा ताबा मिळवला. असं असलं तरी आपणही त्याला प्रत्युत्तर नाही तरी प्रतिबंध करू शकतो. अर्थात हे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखं होईल. पण तरीही वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हे सूर्याला, त्याच्या उष्णतेला प्रतिबंध करण्यासाठीचे खात्रीचे उपाय आहेत. त्याचा उपयोग आपल्याला काही वर्षांनी होईलच. पण आज मात्र ह्या वाढत्या उन्हाळ्यावर काही उपाय करता येईल का?
मला वाटतं प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. अर्थात असे गंभीर प्रश्न उद्भवयालाच नको. पण यालाही आपणच जबाबदार आहोत ना? जर आपणच या प्रखर उन्हाळ्याचा प्रश्न निर्माण केला आहे तर उत्तरही आपणास शोधायला हवं असं मला वाटतं.
उन्हाळ्यात सगळ्यांना सगळ्यात जास्त भेडसावणारा प्रश्न म्हणजे ‘जीवनाचा’ अर्थात पाण्याचा. पाण्याचा हा ज्वलंत प्रश्न फक्त माणसांपुरताच मर्यादित नाही बरं का! तर प्राणी, पक्षी, वनस्पती, झाडं, झुडपं, शेती,पिकं आणि ही धरणी माता या सगळ्यांसाठीच आहे.
आपण फक्त आपलाच विचार करतो. पण बाकी या मुक्या जीवांची काळजी देखील आपणच घ्यायला नको का? कारण पाणी वाया घालवणारे आपणच आहोत तसंच पाणी वाचवू शकणारे सुद्धा आपणच आहोत. चला तर मग स्वार्था बरोबरच परमार्थही साधूया आणि हा उन्हाळा आणि प्रत्येकच उन्हाळा आपण सुसह्य करूया. अर्थात सद्यस्थितीत आपण पाणी वाचवूया. आणि दरवर्षी झाडे लावून आणि त्यांचे संगोपन करून नेहमीसाठी सगळ्या वातावरणाचे उष्णतेपासून संरक्षण करूया.
अहो पण पाणी वाचवायचं कसं? सांगते ना. अगदी रोज आपण पाणी वाचवू शकतो. सकाळी उठल्याबरोबर दात घासताना आपण खूप पाणी वाया घालवतो. अगदी तसेच जेवण झाल्यावर हात धुताना, गुळण्या करतांना, त्याचप्रमाणे चेहरा धुताना सुद्धा आपण खूप प्रमाणात पाणी वाया घालवतो. आता हेच बघा ना दात घासल्यावर गुळण्या करताना नळ सुरुच असतो. जेवण झाल्यावर हात धुतल्यावर, गुळण्या करतांना, पाणी तोंडात घेतल्यावर, तो नळ सुरुच असतो ना. म्हणजे पाणी वापरण्यापेक्षा पाणी वाया जाण्याचं प्रमाण यावेळी जास्त असतं. तसेच चेहरा धुताना हवा तेव्हढाच नळ सुरु करा. बघा खूप पाणी वाचेल. याचप्रमाणे बरेच जण अंघोळीला शॉवरचं पाणी वापरतात. पण त्यामुळे किती पाणी वापरले जाते याचा अंदाज येत नाही. त्याऐवजी बादलीत पाणी घेतलं तर आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि पाण्याचा अपव्यय टाळता येईल. या उन्हाळ्यात आपल्या घरी कोणी आल्यास प्यायला पाणी देताना ग्लासमध्ये समोरच्यांना विचारूनच पाणी दिलं तर बरं होईल. अन्यथा आपण ग्लासभर पाणी दिले आणि तेवढे प्यायला गेले नाही तर ते पाणी आपण फेकून देतो. म्हणजे पुन्हा पाण्याचा अपव्यय होतो.
स्वयंपाकासाठी, धुणं, भांडी, फरशी पुसणे इत्यादी कामांसाठी सुद्धा पाणी जपून वापरलं तर त्याच पाण्याचा उपयोग झाडांसाठी होऊ शकतो. फरशी पुसल्यावर उरलेलं पाणी जर जमिनीवर, अंगणात टाकता आलं तर तेवढीच का होईना पण ती जागा पाण्याने तृप्त होईल. भांडी धुतल्यावर खरकटं पाणी गाळून झाडांना टाकलं तर किंवा पुन्हा अंगणात किंवा जमिनीवर टाकलं तर तेवढेच पाणी जमिनीत जाईल. अर्थात ते पाणी खरकटं नसावं किंवा यामुळे इतरांना त्रास व्हायला ही नको.
प्रत्येक घरातील असं पाणी आपण झाडांना, घरातील कुंड्यांमधील झाडांना दिलं तर मला वाटतं आपल्या स्वार्था बरोबर परमार्थही साधला जाईल. स्वार्थ हा की परमार्थामुळे पुण्य पदरी जमेल. गंमतीचा भाग सोडला तर झाडंही कोरडी होणार नाहीत. त्यांचाही उन्हाळा सुसह्य होईल. तसंच जमिनीत काही प्रमाणात पाणी गेलं तर जमीनही कमी तापेल. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण कमी होऊ शकतं. थोडक्यात सांगायचं तर जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पाण्याचा अपव्यय टाळूया. आपल्याबरोबरच प्राणी, पक्षी, झाडांचीही काळजी घेऊया. शक्यतो सगळ्यांनीच आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा अंगणात किंवा गच्चीवर या पक्षांसाठी पाण्याची सोय करूया आणि त्यांच्यासाठी ही यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया.
*सौ.सीमा श्रीराम शास्त्री मोडक*
नंदुरबार
*संवाद मीडिया*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*प्रॉपर्टी विकणे आहे*
*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*
*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*
*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*
*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*
*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*
*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈
*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*
*👉पारदर्शक व्यवहार*🔍
#######################
*Advt link …👇*
*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*
🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡
*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*
*▪️घर धरून 03 गुंठे जागा*
*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*
*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*
*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*
*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*
*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*
*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
———————————————-