You are currently viewing माहुलीच्या वेशीत रंगले राज्यस्तरीय कवी संमेलन

माहुलीच्या वेशीत रंगले राज्यस्तरीय कवी संमेलन

महाराष्ट्रातील कवींच्या सादरीकरणाचे विक्रमी शतक

स्वराज्य लेखणी मंच आणि माझी लेखणी साहित्य मंच तर्फे शहापूर तालुक्यातील वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे येथे कवी संमेलन संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शंभरपेक्षा जास्त कवी कवयित्रींनी सहभाग घेतला.

उपस्थित मान्यवर, साहित्यिक, विद्यापीठातील साधक यांनी भक्तिगीते गात, फुगड्या खेळत, वाजत गाजत काढलेली ग्रंथदिंडी या संमेलनाचे आकर्षण ठरली.

उदघाटन सोहळ्यानंतर विचार वादळचे संपादक काशिनाथ तिवरे, स्वागताध्यक्ष ह.भ.प. डॉ. कैलास महाराज निचिते, उदघाटक कवी भगवान जाधव यांचे साहित्यिक विचार आणि संमेलनाध्यक्ष चंद्रकांतदादा वानखेडे यांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण उपस्थितांसाठी साहित्यिक मेजवानी ठरली.

यावेळी महाराष्ट्र साहित्य दर्पणचे संपादक कवी गुलाबराजा फुलमाळी, कवयित्री सुनिता कपाळे, कवयित्री प्रीती वानखेडे यांना स्वराज्यरत्न तर कवयित्री स्वप्ना बेलदार, कवयित्री अमृता संखे यांनी लेखणी सम्राज्ञी पुरस्काराने गौरविण्यात आले.

कवी अन्वर मिर्झा, कवी रमेश तारमळे, कवी महेश धानके, कवी गंगाराम ढमके, कवी संजय गगे खरीडकर, कवयित्री डॉ. तरूलता धानके, कवी एकनाथ देसले या निमंत्रितांचे कवी संमेलन साहित्य रसिकांसाठी पर्वणीच ठरली.

त्यानंतर एकापेक्षा एक सरस काव्य सादरीकरण करणाऱ्या कवींचा व स्पर्धा विजेत्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

शहापुरच्या मातीतील प्रकाश फर्डे व संदीप जगताप यांनी आयोजित केलेल्या या कविसंमेलनाचे सर्वत्र कौतुक होत असून या संमेलनासाठी डॉ. संतोष गायकवाड, मनोज विशे, विवेक नार्वेकर, किशोर कुडव, मनोज पानसरे, रवींद्र यशवंतराव, शरद पांढरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. शिवाजी सातपुते, कवयित्री राजश्री मराठे, कवी अनिल केंगार तर प्रास्ताविक आयोजक प्रकाश फर्डे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा