You are currently viewing महागाई विरोधात शिवसेना महिला आघाडीचा एल्गार

महागाई विरोधात शिवसेना महिला आघाडीचा एल्गार

जिल्हाप्रमुख सतीश सावंत,जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या नेतृत्वाखाली ”गॅस पे चर्चा,चुलीवरची चाय”आंदोलनाला महिलांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद

कणकवली शहरात काढण्यात आला भव्य मोर्चा

उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक मोर्चात झाले सहभागी

कणकवली

घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल,खाद्य तेल, रॉकेल यांसहित जीवनावश्यक सर्वच वस्तूंच्या दरात भरमसाट वाढ झाली असून या दरवाढी विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख सतीश सावंत,महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या वतीने कणकवली पटवर्धन चौकात आज ”गॅस पे चर्चा,चुलीवरची चाय”आंदोलन छेडण्यात आले. याठिकाणी चूल पेटवून चुलीवर भाकरी आणि चहा बनविण्यात आली. महागाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाला महिलांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद लाभला होता. महिलांनी हातात महागाई विरोधी घोषणांचे फलक, भगवे झेंडे, भगव्या शाली घेतल्याने परिसर भगवामय झाला होता.
भावोजी भावोजी ….म्हागायचे खोके…. एकनाथ म्हणतात सगळंच ओके”, “दिल्लीतलो चायवालो खय ऱ्हावलो म्हागायचो चटको गरीबाक लागलो”, “गाडी इली गाडी इली गॅस सिलेंडरची गाडी.! बायका पोरा चीडीचाप झाली”, “आनंदाचो शिधो मिळालो काय गो..साखर, तांदळाचा पोता पळाला खय गो..!” पन्नास खोके…महागाई ओके…” अशा पद्धतीचे फलक आणि घोषणा देत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला जात आहे.

*शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत म्हणाले* महागाई नियंत्रणात ठेवण्याचे काम केंद्र सरकारचे असते. केंद्रात भाजप सरकार असून ३५० रु असलेला गॅस ११५० रु पर्यत वाढवण्याचे काम भाजपने केले. ५० रुपये मिळणारे डिझेल १०० रुपये केले.६० रु चे पेट्रोल ११० रुपयावर गेले आहे. आणि जे जे लोक याविरोधात आवाज उठवितात त्यांच्यावर चौकशा लावल्या जात आहेत. हि महागाई कमी करण्यासाठी सरकार बदलणे हाच एक पर्याय आहे. मात्र या अन्यायावर आवाज उठविला नाही,अन्याय सहन केला तर अन्यायाला मुखसंम्मती दिल्यासारखे आहे.त्यामुळे हे आंदोलन मोर्चा हि सुरुवात आहे. महागाई विरोधात देश पेटून उठला पाहिजे.असे आवाहन त्यांनी केले.
*आमदार वैभव नाईक म्हणाले* देशात सर्वच वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. गरिबांना आवश्यक असलेले रॉकेल लिटरला १०० रु देऊनही मिळत नाही. खताचे दर वाढले आहेत. या महागाईसाठी मोदी सरकार जबाबदार आहे. भाजपच्या सत्तेच्या काळात गेल्या १० वर्षात चौपट महागाई झाली आहे. मोठ्या उद्योग पतींना पोसण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. याचा विरोध रस्त्यावर उतरून करायचा आहे. असे सांगितले.
*सतीश सावंत म्हणाले,* महागाई कमी करण्याच्या पोकळ घोषणा केंद्रातील भाजप सरकार करत आहे.गरिबांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार अशा प्रकारच्या फसव्या घोषणा करून नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधान झाले.उज्वला गॅस योजना आणून सुरुवातीला काही महिने त्याची सबसिडी देऊन आता ही सबसिडी देखील बंद करण्यात आली आहे.पुरुषांपेक्षा महिलांना महागाईचे चटके जास्त बसत आहेत. त्यामुळे सरकारला जाग येण्यासाठी हे आंदोलन छेडले असल्याचे त्यांनी सांगितले.
*नीलम पालव म्हणाल्या,* गॅस महाग झाला, रॉकेल मिळत नाही, वृक्षतोड करायची नाही मग महिलांनी जेवण करायचं तरी कसे? त्यामुळे भरमसाठ महागाई वाढवणाऱ्या या सरकारचा धिक्कार आपण केला पाहिजे.वाढलेली महागाई व दरडोई उत्पन्न यामध्ये कुठलाच मेळ नाही ₹गावागावात कुठलेच रस्ते सुस्थितीत नाहीत आणि महिलांना बसमध्ये ५० टक्के सूट दिल्याचे सरकार बोंब मारत आहे. केंद्रात मंत्री असलेल्या स्मृती इराणी यापूर्वी गॅस दरवाढ झाली की त्या रस्त्यावर उतरत मात्र आता ही गॅस दरवाढ झाली तरी त्या गप्प बसून आहेत. त्यांची स्मृती भ्रष्ट झाली आहे म्हणून त्यांना सर्वसामान्यांचे दुःख दिसून येत नाही.त्यामुळे सर्वसामान्य नागरिक स्त्रियांचे दुःख न समजणाऱ्या या सरकारला पुन्हा सत्तेवर आणायचे नाही असा पवित्रा घ्या असे आवाहन त्यांनी केले.
*नगरसेवक सुशांत नाईक म्हणाले,* केंद्र सरकारची उज्वला योजना देखील फेल गेली आहे. लोकांना सिलेंडर घ्यायला परवडत नाही.नागरिकांना आवश्यक असलेल्या रक्त पिशव्यांचे दर देखील या सरकारने वाढवले आहेत.त्यामुळे रक्त विकणाऱ्या सरकारचा निषेध केला पाहिजे यासाठी 3 एप्रिल रोजी ओरोस येथे सुद्धा युवासेनेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार नितेश राणे लव जिहाद वर बोलतात, मोठ्या नेत्यांवर टीका करतात परंतु महागाईवर कधीही ते बोलत नाहीत, एक चक्कार शब्दही काढत नाहीत.राणेंचे मेडिकल कॉलेज, इंजीनियरिंग कॉलेज हे धंदेच आहेत सर्वसामान्यांना लुटण्याचे काम या माध्यमातून राणे करत आहेत अशी टीका त्यांनी केली.
यावेळी महिला तालुका प्रमुख वैदेही गुडेकर, उपतालुका प्रमुख संजना कोलते,माधवी दळवी स्वरूपा विखाळे, उपशहरप्रमुख दिव्या साळगावकर, नगरसेविका मानसी मुंज, अनिषा सावंत,अंजली पांचाळ, अंजली सापळे, विजया कानडे, मधुरा लोके, जयश्री कांबळे,विशाखा कांबळे,इशा कांबळे, नेहा पारकर,पूनम म्हापसेकर, आरती नार्वेकर, मेधावी धुमाळे,अनुजा राणे,रोहिणी पिळणकर, संजना साटम,रीमा साटम, मनाली वारंग, स्नेहल सावंत, मेघा सावंत, प्रतीक्षा बिले, अंकिता सावंत, विशाखा सावंत, साक्षी सावंत,अरुंधती सावंत, छाया सावंत, छाया प्रदीप सावंत जया सावंत,पूजा सावंत,पुष्पलता राणे,मनीषा सावंत, शोभा बागवे, सुप्रिया खडपे , प्रतिभा अवसरे,अंकिता कोकाटे, शर्वरी कोकाटे,शोभा पास्ते,विद्या कुलकर्णी, अनिशा केसरकर, रूपाली मेस्त्री, ज्योती सावंत, सुरेखा सावंत, शोभा परब,पूर्वा साटम,धनश्री मेस्त्री,अविदा डावरे, रूपाली पोयेकर,गीता पिळणकर,हर्षदा पिळणकर, रेश्मा पिळणकर, खोचरे वहिनी ,शोभा मुरकर,

उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये,विधानसभा संघटक सचिन सावंत तालुकाप्रमुख शैलेश भोगले,तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक,नगरसेवक कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, शहर प्रमुख प्रमोद मसूरकर,ऍड. हर्षद गावडे, निसार शेख, महेश कोदे, विलास गुडेकर, राजु राठोड, तात्या निकम, राजु रावराणे, अनुप वारंग,सचिन राणे, सचिन खोचरे, रोहीत राणे,जयेश धुमाळे, बंडू ठाकूर, मंगेश सावंत,एकनाथ कोकाटे,प्रसाद अंधारी,आप्पा तावडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला या महागाई विरोधी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा