You are currently viewing कणकवलीत शिवसेना महिला आघाडीचे महागाई विरोधात आंदोलन

कणकवलीत शिवसेना महिला आघाडीचे महागाई विरोधात आंदोलन

कणकवली

कणकवलीतील पटवर्धन चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीने महागाई विरोधी आंदोलन सुरू केले आहे. “भावोजी भावोजी ….म्हागायचे खोके…. एकनाथ म्हणतात सगळंच ओके”, “दिल्लीतलो चायवालो खय ऱ्हावलो म्हागायचो चटको गरीबाक लागलो”, “गाडी इली गाडी इली गॅस सिलेंडरची गाडी.! बायका पोरा चीडीचाप झाली”, “आनंदाचो शिधो मिळालो काय गो..साखर, तांदळाचा पोता पळाला खय गो..!” पन्नास खोके…महागाई ओके…” अशा पद्धतीचे फलक आणि घोषणा देत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला जात आहे.

या आंदोलनात महिला आघाडी जिल्हा संघटक नीलम पालव, महिला तालुकाप्रमुख वैदही गुडेकर, उप महिला तालुकाप्रमुख संजना कोलते, स्वरूपा विखाळे, मानसी मुंज, दिव्या साळगावकर, माधवी दळवी प्रतिभा अवसारे रोहिणी पिळणकर संजना साटम, आम. वैभव नाईक, जिल्हा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड, शैलेश भोगले, निसार शेख, कन्हैया पारकर, महेश कोदे यांच्यासह १५० हुन अधिक महिला या महागाई विरोधी आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा