You are currently viewing नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून मोंडकर घर ते परबवाडी गटार मंजूर

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून मोंडकर घर ते परबवाडी गटार मंजूर

नगरसेवक संजय कामतेकर व अबीद नाईक यांच्या मागणीला यश

कणकवली

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावात सुरू आहे. मोंडकर घर ते परबवाडी गटार कामाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते गोपाळ वावळीये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला व नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक संजय कामतेकर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला.

कणकवली शहरातील अनेक कामांना मंजुरी मिळाली असून काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. माझ्या प्रभागाला सर्व सुविधांनी परिपूर्ण केल्याबद्दल त्यांचे प्रभागातील जनतेच्या वतीने या कामाबद्दल नगरसेवक संजय कामतेकर व अबीद नाईक यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी नामदेव जाधव, राधाकृष्ण गुरव, संतोष नारकर, मोतीराव पाटील, शेखर सावंत, रमेश सातार्डेकर, प्रदीप पारकर, वासुदेव मोंडकर, सूर्यकांत घाडी, शशिकांत तांबे, बाजीराव कांबळे, सुप्रिया नारकर, ज्योती पाटील, श्रुतिका सावंत, राधिका गुरव, जावेद शेख, नवू झेमणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा