You are currently viewing हे स्मृतिदिनाचे कविसंमेलन म्हणजे संध्याकाळच्या कविता – प्रा.डॉ.नानासाहेब झगडे

हे स्मृतिदिनाचे कविसंमेलन म्हणजे संध्याकाळच्या कविता – प्रा.डॉ.नानासाहेब झगडे

*हे स्मृतिदिनाचे कविसंमेलन म्हणजे संध्याकाळच्या कविता – प्रा.डॉ.नानासाहेब झगडे*

जेष्ठकवी ग्रेस आणि जेष्ठ लेखक बाबुराव बागूल यांच्या स्मृतिदिनी हे विविध विषयांवरील कविसंमेलन प्रतिभावान कवितांनी सादर झाले. आज सभोवतालचे वातावरण भयाचे, दबावाचे आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर कुठेतरी गदा येतो का काय? असे आपण पाहतो आहोत. साहित्यिकांनी ही भूमिका घेणे गरजेचे आहे. असे अध्यक्षीय भाषणात झगडे बोलत होते.
साहित्य सम्राटचे १६४ वे कविसंमेलन डॉ.राममनोहर लोहिया उद्यान हडपसर येथील पुणे महानगर पालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या साहित्यिक कट्ट्यावर पार पडले. कविसंमेलनाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी मान्यवरांचे, कवी कवयित्री आणि रसिकांचे स्वागत केले. तसेच संस्थेच्या कार्याची माहिती आणि साहित्य सम्राटच्या यु-ट्यूब चॅनलच्या हजारो प्रेमींचे धन्यवाद आपल्या प्रास्ताविकेत व्यक्त केले.
या कविसंमेनामध्ये गझल, लावणी, अभंग, लोकगीत, बालकविता, चैत्रपालवी, वैशाख, शेतकरी, रान, पेरणी, प्रेमभंग, व्यसन, नातीगोती, आई बाप, संसार, राजकारण, भ्रष्टाचार, पर्यावरण आणि मराठीभाषा इ. विषयांच्या रचना सादर झाल्या. यामध्ये मा.सुभाष बडधे महाराज, रमेश सरकाटे, प्रज्ञा मराठे, शिवाजी उराडे, ऋचा कर्वे, संजय भोर, प्रा.अशोक शिंदे, गौरव नेवसे, कविता काळे, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामुगडे, बबन धुमाळ, प्रा.उद्धव महाजन, उमा लुकडे, शुभांगी शिंदे, तानाजी शिंदे, सुरेश धोत्रे, दादासाहेब पारसे, आशाताई शिंदे, प्रशांत नवले, देवेंद्र गावंडे, श्रीवर्धन कणसे, जनाबापू पुणेकर, संजय सोनवणे, सीताराम नरके, जगदीप वनशिव, विलास कुंभार इ. अठ्ठेचाळीस कवींनी काव्य रसिकांची माने जिंकली.
बहारदार कविसंमेलनाचे सूत्रसंचालन अॅड.संध्या गोळे यांनी केले. तर आभार गझलकार मसुद पटेल यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा