You are currently viewing मालवण तालुक्यातील पोईपचे माजी सभापती रमेश पालव यांचे निधन

मालवण तालुक्यातील पोईपचे माजी सभापती रमेश पालव यांचे निधन

मालवण :

 

पोईप वरची पालववाडी येथील रहिवासी आणि मालवण पंचायत समिती माजी सभापती श्री.रमेश (भाई) शांताराम पालव (८० वर्ष) यांचे आज रविवारी अल्प आजाराने मुंबई येथे अकस्मात निधन झाले. श्री.रमेश शांताराम पालव उर्फ भाई यांची अंत्ययात्रा उद्या सोमवार दि. २८/०३/२०२३ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता ऐरोली येथील त्यांच्या रहात्या घराकडून निघेल.

पोईप गावचे १५ वर्ष ते सरपंच होते. तर त्या नंतर पाच वर्षे मालवण पंचायत समितीचे सभापती पद त्यांनी भूषविले होते. श्री देव वेताळ मुंजेश्वर देवालय जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष तसेच मालवण तालुका मराठा समाज उपाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी काम केले होते. सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशन चे ते पदाधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा