You are currently viewing “स्वामी समर्थ हे आनंदस्वरूप आहेत!” – स्वामी स्वरूपानंद

“स्वामी समर्थ हे आनंदस्वरूप आहेत!” – स्वामी स्वरूपानंद

श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव, चिंचवड

पिंपरी

“स्वामी समर्थ हे आनंदस्वरूप आहेत! दृढ श्रद्धा ठेवून स्वतःला त्यांच्या ठायी समर्पित करा म्हणजे स्वामी तुम्हाला निर्भय अन् निर्मळ करतील!” असे प्रतिपादन स्वामी स्वरूपानंद यांनी बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, पिंपरी-चिंचवड लिंक रोड, चिंचवड येथे शुक्रवार, दिनांक २४ मार्च २०२३ रोजी केले. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवड आयोजित पाच दिवसीय प्रकटदिन उत्सवात ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!’ या विषयावरील निरूपण करताना स्वरूपानंद बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, कोषाध्यक्ष गणपती फुलारी, सचिव संजय आधवडे, नितीन चिंचवडे, हेमा दिवाकर आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रवचनापूर्वी, चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त जगन्नाथ चव्हाण, धरमदास कुंभार आणि मधू जोशी या संस्थापक सदस्यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ प्रदान करून स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते जीवनगौरव सन्मान करण्यात आला. मधू जोशी यांनी सन्मानार्थींच्या वतीने कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले. प्रकटदिन उत्सवात पहाटे ठीक ४:३० वाजता श्रींचा फळांच्या रसाने अभिषेक आणि पूजा करण्यात आली. स्वामींच्या मूर्तीला आदिशक्ती वस्त्र आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. सकाळी ७:०० वाजता श्रीधरनगर येथील दत्तमंदिरापासून मठापर्यंत गुरूलीलामृत ग्रंथाची दिंडी काढण्यात आली. आळंदी येथील वारकरी भागवत कीर्तन भजन गायन गुरुकुलातील सुमारे चाळीस विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत टाळ-मृदंगासह आणि परिसरातील कलशधारी महिला तसेच पुरुष भाविकांनी फुगड्या, जयघोष करीत दिंडीमध्ये भक्तिरसाचा परिपोष केला. सकाळी ७:३० वाजता श्रींच्या आरतीनंतर स्वामी स्वाहाकार यज्ञास प्रारंभ झाला. सकाळी ९:०० वाजता गुरूलीलामृत ग्रंथपारायण सोहळ्यात सुमारे दीडशे स्त्री-पुरुष भाविकांनी सहभाग घेतला. दुपारी १२:०० वाजता आरती आणि महानैवेद्य अर्पण करण्यात आला; तर सायंकाळी ५:३० वाजता श्रींची सामुदायिक आरती करण्यात आली. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे सदस्य शंकर बुचडे, विजय कुलकर्णी, मीनल देशपांडे यांनी संयोजनात सहकार्य केले. महेश राजोपाध्ये यांनी धार्मिक विधींचे पौरोहित्य केले; तर कैलास भैरट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

– प्रदीप गांधलीकर
७४९८१८९६८२
९४२१३०८२०१

_______________________________
*संवाद मीडिया*

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

_______________________________

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा