You are currently viewing नविन कुर्ली वसाहतीसाठी प्रथम स्वतंत्र ग्रामपंचायत मिळणे आवश्यक…

नविन कुर्ली वसाहतीसाठी प्रथम स्वतंत्र ग्रामपंचायत मिळणे आवश्यक…

अध्यक्ष नविन कुर्ली विकास समिती तसेच जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंत पिळणकर यांचे जि.प. सिंधुदूर्ग मुख्यकार्यकारी यांना निवेदन सादर

कणकवली

पुनर्वसन नियमानुसार नविन कुर्ली वसाहतीला प्रथम स्वतंत्र ग्रामपंचायत मिळणे आवश्यक आहे, अशा आशयाचे निवेदन अध्यक्ष नविन कुर्ली विकास समिती फोंडाघाट तसेच जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंत गंगाराम पिळणकर यांनी जि.प. सिंधुदूर्ग मुख्यकार्यकारी यांना सादर केले आहे.

अलिकडेच गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर नळ योजना चुकीच्या पदधतीने व बाहेरील गावातील व्यक्तीकडून राजकीय स्वार्थासाठी राबविली जात असल्यामुळे गावात गटतट निर्माण झाले आहेत. त्यामुळे गावातील सामाजिक सलोखा व शांतता भंग होण्याची भीती आहे.
गावाला सदय स्थितीत जुन्या योजनेवरुन मुबलक व मोफत पाणी पुरवठा होत असल्याने आम्हाला गावात भांडणे निर्माण करणारी नळयोजना नको. शासन व लोक प्रतिनिधींनी सर्व प्रथम आम्हाला हक्काची ग्रामपंचायत दयावी नंतर आम्ही विकास कामे सुचवू.

अलीकडेच लगतच्या लोरे गावातील पिता-पुत्र पुढा-यांचा हस्तक्षेप वसाहतीत वाढला आहे. आम्हांला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळणार नाही यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. वसाहतीतील 275 पैकी 75 घरे लोरे ग्रामपंचायतीला परस्पर जोडली आहेत. हे सर्वस्वी चुकीचे आहे. प्रकल्पग्रस्त म्हणून शासनाने आम्हाला हे रितसर भूखंड दिले आहेत.
जलजिवन मधून आमच्या गावठाणसाठी मंजूर 46 लाखाची नळ योजना राबविताना अधिकारी व लोकप्रतिनिधींनी आम्हाला विश्वासात घेतलेले नाही. सदर योजनेची विहीर लोरे गावाच्या हददीत असून या योजनेवरुन तेथील काही घरांना परस्पर पाणी पुरवठा करण्याचा काही जणांचा हेतू आहे. मुळात नविन कुर्ली वसाहतीला गेली 14 वर्षे नियमीत मुबलक व मोफत पाणीपुरवठा होत असून आम्हाला पर्यायी नळ योजनेची आवश्यकता नाही. प्रशासनाने नव्याने प्रस्तावित नळयोजना रदद करावी अन्यथा आम्हा प्रकल्पग्रस्तांना आंदोलन छेडावे लागेल. तरी आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत करुन देण्याची कृपा करावी असे अध्यक्ष नविन कुर्ली विकास समिती नविन कुर्ली फोंडाघाट तसेच जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंत गंगाराम पिळणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. सोबत उत्तम तेली सेनापती सावंत देवेंद्र पिळणकर उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा