You are currently viewing सावंतवाडीत “उपचार माणुसकीचा” या दीर्घ कथासंग्रहाचे प्रकाशन…

सावंतवाडीत “उपचार माणुसकीचा” या दीर्घ कथासंग्रहाचे प्रकाशन…

सावंतवाडी

माजगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोतीराम टोपले यांनी लिहिलेल्या “उपचार माणुसकीचा” या दीर्घ कथासंग्रहाचे प्रकाशन श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक एम. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. येथील केशवसुत कट्टा येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा व माजगाव गरड येथील सहयोग ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, लेखक मोतीराम टोपले, सहयोग ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप गोडकर, कोकण मराठी साहित्य परिषदचे जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे, तालुका खजिनदार डॉ. दीपक तुपकर,ॲड. अरुण पणदूरकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, सुभाष गोवेकर, दीपक पटेकर, मंगल नाईक, संतोष पवार, सुहासिनी सडेकर, दत्ताराम सडेकर, तारिका टोपले, प्रदीप पियोळकर, विकास गोवेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अण्णा देसाई, अरुण मेस्त्री, दिलीप भाई, मुकुंद वझे, राजेंद्र बिर्जे, विलास पंडित, सोमनाथ जीगजींनी, बाळासाहेब नंदीहळी, सौ. कासार, प्रदीप ढोरे, शंकर प्रभू, प्रसाद टोपले, सौ. टोपले आदी उपस्थित होते.

यावेळी टोपले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राध्यापक कुलकर्णी म्हणाले, शास्त्र शाखेचा विद्यार्थी साहित्य क्षेत्रात आपले कला दाखवितो हे खरंच कौतुकास्पद आहे. मोतीराम टोपले यांनी ज्या दीर्घकथा लिहिल्या होत्या त्या त्यांनी मला वाचायला दिल्या आणि त्यामध्ये एक वास्तव्याचे भान दिसले. मी त्यांना तुम्ही पुस्तक स्वरूपात हे प्रकाशित करा, असं सुचवलं आणि त्यांनी पुस्तकाची ही पहिली आवृत्ती सादर केली आहे, असं लिखाण त्यांनी करत राहावं.

यावेळी लेखक मोतीराम टोपले यांनी आपण एड्स संदर्भात जनजागृती आणि आजची तरुण पिढी यापासून दूर राहावी यासाठी आपण लिखाण केले. तसेच एकांकिकाही सादर केल्या, दीर्घ कथासंग्रह लिहिताना मला अनेकांचे सहकार्य लाभले. यावेळी भरत गावडे यांनी मोतीराम टोपले यांनी दीर्घकथा संग्रह लिहिला तो वास्तव्याला धरून असा आहे. त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये माणुसकी आणि वास्तव्य दिसत आहे. प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. सावंत म्हणाले, लिहित्या हातांना व्यासपीठ देऊन नवनवीन लेखक समाजासमोर आणावेत हा कोकण मराठी साहित्य परिषदेचा उद्देश आहे. आणि त्या हेतूनेच आम्ही अशा लेखकांना समाजासमोर आणण्याचे काम करत आहोत. सहयोग ग्राम विकास मंडळ आणि कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने मोतीराम टोपले यांचे हे पुस्तक लोकांसमोर आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम घेतला नवोदित लेखकांनी सुद्धा असे लिहीत राहावे. त्यांच्या पाठीशी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 11 =