You are currently viewing नागरिक आणि महापालिका यांच्या समन्वयातून ऑक्सिजन पार्कची उभारणी

नागरिक आणि महापालिका यांच्या समन्वयातून ऑक्सिजन पार्कची उभारणी

*नागरिक आणि महापालिका यांच्या समन्वयातून ऑक्सिजन पार्कची उभारणी*

पिंपरी

निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २६, आकुर्डी दूरध्वनी केंद्रासमोर उभारण्यात आलेले ऑक्सिजन पार्क म्हणजे पर्यावरणाविषयी जागरूक नागरिक आणि पिंपरी – चिंचवड महापालिका यांच्यातील समन्वयाचा उत्तम वस्तुपाठ म्हणता येईल. २०१८ सालापासून माजी नगरसेविका शर्मिला बाबर आणि अन्य लोकप्रतिनिधी तसेच ऑक्सिजन पार्क रेसिडेन्स असोसिएशन ही सेवाभावी संस्था यांनी आकुर्डी दूरध्वनी केंद्रासमोर असलेला ०.६१ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड महानगरपालिकेत हस्तांतरित करण्यात यावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला होता. पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शनिवार, दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी आठ वाजता या नियोजित ऑक्सिजन पार्कमध्ये सुमारे २१६ देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. पिंपरी – चिंचवड महापालिका उद्यान आणि जनसंपर्क उपायुक्त रविकिरण घोडके, सहउद्यान अधीक्षक राजेश वसावे, उद्यान पर्यावेक्षक संदीप गायकवाड, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, माजी नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक राजू मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, पर्यावरणप्रेमी धनंजय शेडबाळे, ऑक्सिजन पार्क रेसिडेन्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय नाईक, उपाध्यक्ष जयकुमार गुजर, सचिव धनंजय कदम, सदस्य सोनलकुमार सिंगी, विश्वजित हरूगडे, प्रशांत शेजवळ, हनुमंत रेडकर, देवेंद्र खडसे, संतोष मोरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या वृक्षारोपणात सहभाग घेतला. अतिक्रमण आणि विध्वंसक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ऑक्सिजन पार्कच्या सभोवताली सीमाभिंती उभारण्यात आलेल्या असून वृक्षारोपणासाठी फुलपाखरे आणि पक्षी आकर्षित होतील; तसेच प्राणवायूचे जास्तीत जास्त प्रमाणात उत्सर्जन करतील अशा वृक्षांची निवड करण्यात आलेली आहे. शहरीकरणामुळे वाढत्या प्रदूषणाला आळा घालणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे या उद्देशाने परिसरातील विविध गृहरचना संस्थांमधील जागरूक नागरिक एकत्र आले. त्यांनी नाशिक आणि अन्य ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन पार्कांना भेटी देऊन, अभ्यास करून प्रकल्पाची मागणी केली. त्याला लोकप्रतिनिधी आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त, उपायुक्त यांच्यासह सर्वांनी सहकार्य केल्यामुळे एक आदर्श प्रकल्प कार्यान्वित झाल्याची भावना उपस्थिती नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा