You are currently viewing जीवनातली रंगपंचमी…

जीवनातली रंगपंचमी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*जीवनातली रंगपंचमी…*

तसे आम्ही खेड्यातले खेडवळंच ! बालपण सगळे
खेड्यात गेले. मी घरात सगळ्यात लहान असल्यामुळे
बालपण परिस्थिती नुसार छानच गेले. कसली चिंता
नसणे हेच मुळी बालपणाचे महात्म्य नाही काय?
नक्कीच आहे. मला आठवते तो काळ कापडण्यातला
१९५९ ते १९६४ पर्यंतचा, मी कापडण्यात होते. पण मला
आठवते तसे एकदाही कुणी कापडण्याला रंग खेळल्याचे
व भयाभूत चेहऱ्याचे गांवकरी मला आठवत नाही. कुणी
खेळले असते तर.. एखादा तरी प्रसंग मला आठवला
असताच ना? नक्कीच आठवला असता.पोटाच्या साठमारीत
कसली रंगपंचमी खेळणार हो ते? ते त्यांना रिकामटेकड्यांचे
उद्योग वाटत असणार ! नक्कीच! कारण मला आठवतात
पहाटे लवकर शेतावर जाणारे शेतकरी व बैलगाड्या आणि
बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा नाद …! तेच त्यांचे जीवन होते.

उलट मी ६५/६६ ला धुळ्याला आले तर प्रथमच तेथील
रंगपंचमी पाहून थरारून गेले नि त्या आठवणी अजूनही
माझ्या स्मरणात आहेत इतकी रंगपंचमी माझ्यासाठी
नवलाईची ठरली. काय तो जल्लोश? काय तो उत्साह
आणि उर्जा..अबबबबबबब… मी कधीच विसरणार नाही.
मामा रहात असलेल्या सहाव्या गल्लीत (धुळ्याची रचना
ब्रिटिशांनी आखूनरेखून गल्ली क्रमांकानुसार केली आहे.
सात गल्ल्या आहेत, अगदी सरळ रेषेत.) बैल गाड्यांवर
मोठमोठे रंगांचे भरलेले ड्रम ठेवून लेझिमच्या तालावर
नाचत गात रंग उडवत भला मोठा जनसमुदाय मुंगीच्या
गतीने आनंदाने चित्कारत पुढे पुढे सरके व वरच्या मजल्या
वरून या समुदायावर भरभरून पाण्याचा वर्षाव होई.
असा दुपार टळून जाई पर्यंत हा समुदाय फिरत असे. व
बघ्यांचा समुदाय मजल्यांवरून त्याचा आनंद लुटत असे.
धमाल धमाल धमाल असा तो धामधुमीचा व आनंदाचा
दिवस असे. क्वचित मारामाऱ्या भांडणे ही होत असत तेव्हा
ते कळायचे आमचे वय नव्हते तेच बरे होते.

आता कितीतरी वर्षे उलटून गेली तरी तो प्रसंग मी अजून विसरले नाही. व्यक्तिशः मला स्वत:ला रंग खेळणे आवडत
नाही.पण कधी कधी नाईलाज म्हणून सामिल झाले तर कधी
चक्क दारे लावून घेते.अलिकडे रंगपंचमीच्या नावाखाली जी विकृती शिरली आहे तिच्या विषयी काही भाष्य करायलाच
नको.कुठे बायकोच्या गालाला नजाकतीने डोळ्यात पहात
हळूवार पणे ती लाजतांना रंग लावणे तर कुठे हा आचरट
धसमुसळेपणा ! तुलनाच करता येत नाही.

खरं तर जीवनातले छोटे छोटे जे आनंदाचे क्षण आहेत तेच
मला रंगपंचमी वाटतात. क्षितिजावरचे रंग जसे आपल्याला
अपरिमित आनंद देतात तसेच ते क्षण आपल्याला अपरिमित
आनंद देतात. नविन लग्न झाल्यानंतरचे ते पहिले वर्ष !
किती आठवतात हो ते दिवस .. पुढे भले ही त्याचे निर्माल्य
होवो, पण स्मृतीच्या एका कप्प्यात ते अत्तराच्या कुपी सारखे
बंद असतात व कधी तरी स्मृती पटलाच्या बाहेर येऊन मनाला
नक्कीच सुखावतात. ही सुखाची रंगपंचमी नव्हे काय?
लहान पणी मोठ्या भावाने व बहिणीने नुसती रिबिन किंवा
नवे दप्तर आणले तरी काय आनंद व्हायचा? मी बी एड्
झाल्या नंतर नोकरी मिळायच्या आधी शिवण मशिन आणले.
नशिब पहा, मी मशिन आणले नि मला कॅालेजची ॲार्डर
मिळाली. ती ॲार्डर मिळताच मी तडक ती दाखवायला
पाय तुडवत नवऱ्याला दाखवायला कॅालेजवर गेले. किती
खुष झाले होते मी! माझ्या अपरिमित कष्टांना किती गोंडस
फळ आले होते पहा ! माझ्या जीवनाची रंगपंचमी येथूनच
तर सुरू झाली, व कष्टांची साथ मिळत उत्तरोत्तर त्यात
दैव रंग भरत गेले. आज सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत असतांना
मनात विविध रंगांची रांगोळी फुलू लागते व म्हणावेसे वाटते,

“ देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला”..

“धन्यवाद मंडळी”…

आणि हो ही फक्त माझी मते आहेत …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: १४ मार्च २०२३
वेळ : संध्या. ६/२९

_______________________________

*Web link*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या हक्काचे घर बुक करा*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*1 BHK & 2 BHK फ्लॅट्स*

*🏤”दर्पण कन्स्ट्रक्शन”*
*🏚️सावंतवाडी🌳*

*घेऊन आले आहेत…! अगदी 🏞️नरेंद्र डोंगराच्या🌳 कुशीत…! प्रसिद्ध माठेवाडा🛕 परिसरात*

*🏬 देवगिरी हाइट्स 🏬*
*आठ मजली भव्य प्रकल्प…*

*📲 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :-*👇
*9890968845 / +918379896943*

*🏠ऑफिस :- 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग*

*🌐Advt Web link*

———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =