You are currently viewing गुढी पाडव्याच्या दिवशी शाळेत प्रवेश

गुढी पाडव्याच्या दिवशी शाळेत प्रवेश

बांदा केंद्र शाळेच्या वतीने राबविला उपक्रम

*बांदा*

जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणा-या विद्यार्थ्यांचे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर स्वागत करण्यात आले.
वास्तविक दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही १५ जूनपासून होत असते.उपक्रमशील शाळा व जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या म्हणून ख्याती असलेल्या जिल्हा परिषद बांदा केंद्र शाळेत गुढी पाडव्याचे औचित्य साधून इयत्ता पहिलीत दाखल होणा-या विद्यार्थ्यांचे स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .या दिवशी विद्यार्थ्यांचे कोल्हापूरी फेटे बांधून औक्षण करण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांचे पेढा भरवून तोंड गोड करण्यात आले. यावेळी सन २०२३-२४या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी पालकांनी शाळेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मोरजकर,बांदा सरपंच प्रियंका नाईक, पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये, उपशिक्षक जे.डी.पाटील,प्रशांत पवार,गोपाळ साबळे,पालक संतोष मंजिलकर, प्रणाली बांदेकर,संचिता मंजिकलकर, अंकुश ठाकूर आदि पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + thirteen =