वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटी लिमिटेड ने वेसावा येथे बांधलेल्या सांस्कृतिक भवन वास्तूचे उद्घाटन आज केले. स्वातंत्र्यपुर्व काळामध्ये स्थापन झालेल्या ह्या संस्थेने आपल्या आयुष्याची ७४ वर्ष पुर्ण केली आहेत. माणसाच्या आयुष्यात हा वार्धक्याचा काळ समजला जातो, मात्र एखाद्या संस्थेने ७४ वर्ष पुर्ण करणं हे त्या संस्थेच्या प्रगल्भतेचं द्योतक असतं. संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ज्या एकजुटीने व तळमळीने काम करत आहेत ते पाहुन आनंद झाला असल्याचे ना. असलम शेख म्हणाले
ही उभी राहिलेली सांस्कृतिक भवनाची वास्तू त्याच मेहनतीची फलश्रुती आहे. कोळी समाजाशी असलेले माझे नाते फार जुने आणि अतुट आहे ; कारण माझ्या प्रत्येक विजयात नेहमीच कोळी समाज बांधवांचा सिंहाचा वाटा राहिलाय.. सीमांकन, डिझेल परतावा, कोळी समाज भवन अशा विविध विषयांवर कोळी समाज बांधवांशी आज मनमोकळ्या गप्पा मारता आल्या.
सीमांकन प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येणाऱ्या काही दिवसांमध्ये मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन मी कोळी समाज बांधवांना दिले आहे.
कोळी समाज बांधवांचा प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी अस्लम शेख (मंत्री – वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा पालकमंत्री मुंबई शहर) यांनी सांगितले.