बांदा-संकेश्वर मार्ग सावंतवाडी शहरातूनच झाला पाहिजे….

बांदा-संकेश्वर मार्ग सावंतवाडी शहरातूनच झाला पाहिजे….

राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील व्यापाराचा विचार करता बांदा-संकेश्वर मार्ग हा सावंतवाडी शहरातूनच झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली आहे.बांदा-संकेश्वर मार्ग हा सावंतवाडी शहरातूनच व्हावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आग्रही आहे.

सिंधुदुर्ग, कर्नाटक व कोल्हापूरला जोडला जाणारा हा रस्ता शहरात विकासाच्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. मागील झाराप-पत्रादेवी महामार्ग शहराबाहेरून गेल्याने शहर एका बाजूस पडल्याने शहरातील व्यापारावर देखील त्याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे बांदा-संकेश्वर मार्ग हा सावंतवाडी शहरातूनच झाला पाहिजे अशी मागणी करून तसे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन करणार असल्यचा इशाराही पुंडलिक दळवी यांनी दिला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे याकडे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा