You are currently viewing गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘आनंदाचा शिधा’एक लाख 58 हजार 749 कुटुंबियांना

गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ‘आनंदाचा शिधा’एक लाख 58 हजार 749 कुटुंबियांना

 -जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते

सिंधुदुर्गनगरी

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअतंर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवाडॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती  निमित्त 1 लाख 58 हजार 749कुटुंबांना  राज्य शासनाच्यावतीने 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली आहे.

‘आनंदाचा शिधा’ मध्ये 1 किलो रवा1 किलो चणाडाळ1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश आहे.हे शिधाजिन्नस प्रति शिधापत्रिकाधारकांना ई पॉस प्रणालीव्दारे प्रति संच 100 रुपये दराने वितरीत करण्यात येणार आहे.

            जिल्ह्यामध्ये गोदाम निहाय शिधाजिन्नस संच्याचा पुरवठा पुढीलप्रमाणे आहे.  गोदामाचे नाव  सावंतवाडी  -25 हजार 175, दोडामार्ग -9 हजार 54, वेगुर्लां- 16 हजार 257, कुडाळ- 29 हजार 345, कणकवली -26 हजार 537, मालवण- 12 हजार 534, आचरा, 9 हजार 120, देवगड, 11 हजार 666, विजयदुर्ग 9 हजार 702, वैभववाडी- 9 हजार 359  असे एकूण 1 लाख 58 हजार 749 शिधा पत्रिकाधारकांना आनंदाच्या शिधा संच्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा