You are currently viewing देवगड निपाणी राज्यमार्ग आय.टी.आय. फोडा पासून लोरे तिठा पर्यंत डांबरीकरण व गटार होणेबाबत.

देवगड निपाणी राज्यमार्ग आय.टी.आय. फोडा पासून लोरे तिठा पर्यंत डांबरीकरण व गटार होणेबाबत.

आमदार नितेश राणे यांना सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केली निवेदनाद्वारे मागणी

फोंडाघाट

देवगड निपाणी राज्यमार्गावर आय.टी.आय. फोंडा ते लोरे फाटा खराब रस्ता आणि जिवितास हानीकारण म्हणून गतवर्षी तिव्र आंदोलन करण्याची सूचना दिल्याने आपल्या कार्यालयातील इंजिनिअर्स यांना पाहणीसाठी बोलावण्यात आले होते. तात्पुरती डागडुजी करून पुन्हा डांबर टाकून खड्डे भरुन घेण्यात आले. परंतु गटारे दुरुस्त केली नाहीत. पावसाळा संपल्यानंतर मार्ग चांगला करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

सध्या परिस्थितीत पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी पुन्हा आंदोलन करणे हे योग्य नाही. तरी या मार्गावरीत गटारे बांधून या मार्गावर डांबरीकरण करणे फारच अत्यावश्यक आहे. या बाबतीत मा. प्रभू मॅडमना सांगितले असून त्यांना हा विषय माहिती आहे. देवगड-निपाणी मार्गातील आय.टी.आय. फोंडा ते लोरे फाटा भाग त्वरीत डांबरीकरण करु घेण्यात यावा. कारण या मार्गावर ४ माणसांनी जीव गमाविला आहे.
तरी या मार्गावरती त्वरीत कार्यवाही करणे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी आमदारकी शिवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा