You are currently viewing राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली

*राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी मागील सात दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत आज चर्चा केली. या चर्चेमध्ये तोडगा निघाला असून उद्यापासून संप मागे घेण्याचा निर्णय संपकऱ्यांनी घेतला आहे. तीन महिन्यांमध्ये सरकार मागण्या पूर्ण करेल, त्यामुळे उद्यापासून संप मागे घेत आहोत असं संपकऱ्यांच्या वतीने समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना सांगितलं. उद्यापासून कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचं आवाहन काटकर यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या शिष्टमंडळामध्ये १६ सदस्य होते. मागील काही वेळापासून संपकरी आणि सरकारसोबत चर्चा सुरु होती. ही चर्चा यशस्वी झाली आहे. सरकार संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं काटकर यांनी सांगितलं. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं सरकारने आश्वासन दिल्याचं काटकर म्हणाले.

 

_______________________________
*संवाद मीडिया*

*👉मोफत समुपदेशन….मोफत समुपदेशन …*

*”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने*

*” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी*

🔹रत्नागिरी तालुक्यातील इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ” महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ” शिरगाव रत्नागिरी, यांच्या वतीने *_”एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने “_* १२ वी नंतर विविध क्षेत्रातील सुवर्ण संधींवर मार्गदर्शन हा मोफत समुपदेशन कार्यक्रम *_शुक्रवार , दिनांक २४ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:००_* या वेळेत *मराठा भवन मंगल कार्यालय* ,जिल्हा परिषदे जवळ , रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे .

*प्रमुख वक्ते :प्रा .विजय नवले (करिअर पाथ निर्मिती मध्ये विश्वविक्रम करणारे तज्ञ )*

🔹या कार्यक्रमासाठी मोफत नाव नोंदणी खालील गुगल फॉर्म लिंक द्वारे करावी .

https://forms.gle/Sv7pZYtT9X1Lw2F18

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था*
*कॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वूमेन*

*📲संपर्क क्रमांक :*

*९४२०२७४११९*
*७९७२९९७५६७*

प्रतिक्रिया व्यक्त करा