You are currently viewing शाश्वत सेवा बहूउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी सौ. मिताली मातोंडकर यांची निवड

शाश्वत सेवा बहूउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षपदी सौ. मिताली मातोंडकर यांची निवड

वेंगुर्ला :

शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी हौशी रंगभूमीवरील अभिनेत्री सौ. मिताली मातोंडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सहाय्यक धर्मादाय न्यासकडून नुकतेच या संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

कार्याध्यक्षपदी मूळ मातोंड गावचे रहिवासी व सध्या यवतमाळ जिल्यात सहाय्य्क पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले संजय एकनाथ मातोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी सुकळवाड येथील संजय पाताडे, सचिवपदी पत्रकार महेंद्र मातोंडकर, खजिनदारपदी चौकुळ येथील राजकुमार चव्हाण, सहसचिवपदी सौ. सायली मातोंडकर, सहखजिनदारपदी कुडाळ येथील डॉ. कु. सिद्धी चव्हाण यांची, तर सदस्य म्हणून सौ. संजना पाताडे व सौ. राजश्री चव्हाण यांची निवड झाली आहे.

आरोग्य, शिक्षण, साहित्य व सामाजिक क्षेत्रात कायमस्वरूपी सेवा उपलब्ध करून देणे, शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करणे, नाटक, पथनाट्यातून समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान आदी शासनाच्या विविध अभियानांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, नृत्य, अभिनय, संगीत प्रशिक्षण वर्ग सुरु करणे, छोटया मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे, तसेच युवा वर्गासाठी व्यावसायाभिमुख उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेतर्फे दर महिन्याला किमान एक कार्यक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला असून वर्षभर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी 9158881618 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थापक महेंद्र मातोंडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा