You are currently viewing सावंतवाडी तालुका क्रीडा महोत्सवाचे २६ रोजी आयोजन

सावंतवाडी तालुका क्रीडा महोत्सवाचे २६ रोजी आयोजन

नेहरू युवा केंद्र, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा पुढाकार

सावंतवाडी

नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार) व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन रविवार दिनांक २६ मार्च रोजी करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेज सावंतवाडीच्या भव्य क्रीडांगणावर होणार आहेत.
या क्रीडा महोत्सवात सावंतवाडी तालुक्यातील सर्व महाविद्यालयानी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी केले आहे. तालुकास्तरिय स्पर्धेमध्ये गोळाफेक, थाळी फेक, १०० मीटर धावणे आणि व्हॉलीबॉल हे खेळ असणार आहेत. विजयी खेळाडूंना भारत सरकारच्या खेलमंत्रालयाचे प्रमाणपत्र व चषक देण्यात येणार आहे. यासाठी स्पर्धकांची मोफत नोंदणी स्पर्धेच्या दिवशी त्याच ठिकाणी सकाळी ८ ते ९.३० या वेळेत करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अजिंक्य शिंदे (मो. ७६२०४३९०३९) किंवा व प्रथमेश सावंत (मो. ८७८८५८३६३७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + five =