You are currently viewing मडुरा सोसायटी निवडणूकीत भाजप पुरस्कृत पॅनेलचा दणदणीत विजय

मडुरा सोसायटी निवडणूकीत भाजप पुरस्कृत पॅनेलचा दणदणीत विजय

बांदा

मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत अपेक्षेप्रमाणे भाजप पुरस्कृत श्री देवी माऊली शेतकरी सहकार विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. एकूण १२ पैकी ११ उमेदवार विजयी झाले. तीन उमेदवारांना समान मते पडल्याने काढलेल्या ईश्वर चिठ्ठीत माजी चेअरमन संतोष परब विजयी झाले. या विजयाने भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे.

मडुरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया रविवार १९ मार्च रोजी संपन्न झाली. ९१९ मतदारांपैकी ३७९ सभासदांनी मतदानाचा हक्क बजाविला. १३ संचालक संख्या असलेल्या सोसायटीत भाजप पुरस्कृत पॅनलचे अनुसुचित जाती जमाती मतदार संघाचे उमेदवार देवू नवलू कोळापटे हे बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे १२ संचालक जागांसाठी निवडणूक झाली. त्यासाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. संस्थेच्या कार्यालयात सायंकाळी उशिरा मतमोजणी झाली.

भाजप पुरस्कृत श्री देवी माऊली शेतकरी सहकार विकास पॅनलचे ज्ञानेश परब (१९१ मते), सुरेश गावडे (२०१), आत्माराम गावडे (१८४), उदय देऊलकर (२०१), दत्ताराम परब (१७०), सुकाजी मोरजकर (१७०), शामराव म्हाडगुत (१९४), जयराम गवंडे (१९४), अर्चना परब (१९६), सुविधा धुरी (१७६), पुंडलीक जाधव (१९७) विजयी झाले.

उमेदवार लाडू परब, संतोष परब व उल्हास परब यांना समान १६६ मते पडल्याने ईश्वरी चिठ्ठी काढण्यात आली. कु. गौरवी सावळ हीने काढलेल्या चिठ्ठीत संतोष परब यांचा विजय झाला. सर्व विजयी उमेदवारांचे भाजप प्रवक्ते संजू परब, सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, दिलीप परब यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + six =