You are currently viewing निगुडेत महिलांसाठीचे व्यवसाय प्रशिक्षण संपन्न !

निगुडेत महिलांसाठीचे व्यवसाय प्रशिक्षण संपन्न !

बांदा

निगुडे ग्रामपंचायत येथे १५ वा वित्त आयोगामार्फत महिलांना व्यवसाय प्रशिक्षण कोल्हापूर संस्थेमार्फत देण्यात आले. यावेळी कोल्हापूर व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय देसाई, प्रशिक्षणार्थी प्रकाश पाटील यांनी महिलांना प्रशिक्षण दिले.
यावेळी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रम गावात तीन ठिकाणी संपन्न झाला. ५० महिलांनी प्रशिक्षण घेतले. यावेळी अनेकांनी कापडी पिशव्या बनविल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशासेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर यांनी केले.
संजय देसाई म्हणाले की, कोणताही व्यवसाय किंवा त्याचे प्रशिक्षण घेत असताना महिलांनी ते घेतल्यानंतर त्यातून मी पहिल्यांदाच असं बघितलं की रात्री दोन दोन वाजेपर्यंत महिलांनी सदर कापडी पिशव्या बनवल्या. खरोखर ही बाब कौतुकास्पद आहे. आपण व्यवसाय प्रशिक्षण घेतलात आणि त्यातून आपण काहीतरी एक ऊर्जा निर्माण केली. हे पाहून मी खरोखर भारावून गेलो.
निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर म्हणाले की, गावातील महिलांनी सक्षमपणे पुढे यायचे आणि व्यवसाय उद्योग करायचा. माझ्या परीने जे सहकार्य असेल, ते मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपणास करीन असे आश्वासन दिले. आपण या १५० ते २०० कापडी पिशव्या विविध ११ प्रकारच्या बनवल्यात खरोखर कुठेतरी महिलांसाठी दहा टक्के निधी ग्रामपंचायत च्या माध्यमातून महिलांसाठी असतो त्याचा पुरेपूर उपयोग झाला. यावेळी माजी सरपंच समीर गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, ग्रामपंचायत सदस्य साक्षी गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी शमिता नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य ईशा तुळसकर, विषया गवंडे, सीआरपी संजना केसरकर, संजना गावडे, महिला बचत संघ अध्यक्ष, सदस्य महिला असे अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य साक्षी गावडे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 11 =