You are currently viewing जामसंडे शांतीनगर येथे महिलेची आत्महत्या
Suicide. Torn pieces of paper with the words Suicide. Black and White. Close up.

जामसंडे शांतीनगर येथे महिलेची आत्महत्या

देवगड

जामसंडे शांतीनगर येथील गीता संतोष कराडे या विवाहित महिलेने या विवाहित महिलेने घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली आहे.

18 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार सौ गीता संतोष कराडे ही महिला आपल्या पती तीन मुलांसमवेत जामसंडे शांतीनगर येथे राहत होती. तिचे पती संतोष कराडे हे इमारती सेंट्रींग चे काम करत असून शनिवारी सायंकाळच्या सुमारास या महिलेचे वडील व भाऊ तिला भेटण्यासाठी देवगड येथे आले होते. ते दोघेही रात्री तिच्या घरी जेवण करत असताना ते ती घरात दिसली नाही म्हणून शोधाशोध केली असता घराच्या पाठी असलेल्या विहिरीमध्ये तिचा मृतदेह सापडून आला याबाबतची खबर तिचा पती संतोष कराडे यांनी दिली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =