You are currently viewing ओवळीये नंतर जुगाराची स्वारी कसालच्या दिशेने…

ओवळीये नंतर जुगाराची स्वारी कसालच्या दिशेने…

*संवादच्या बातमीनंतर “ना”वडे ला धरले धारेवर…”गावात जुगार नको…!”*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असणारे जुगार ही जरी अवैध्य धंदे करणाऱ्या जुगाऱ्यांना शान वाटतं असली खाकी वर्दीला संधी तरी प्रत्येक गावाला जुगार सारखे अवैध्य धंदे म्हणजे गावाची बेइज्जती वाटते. संवाद मीडियाच्या बातमी नंतर ओवळीये जंगलात जुगार खेळण्यास गावातील लोकांनी बंदी केली असून “गावात जुगार नको” अशी तंबी देत “ना”वडे ला धारेवर धरले आहे. त्यामुळे ओवळीये नंतर जुगाऱ्यांची स्वारी कसालच्या दिशेने गेली असून कसाल पासून ६.०० किमी अंतरावरील एका गावकरी माणसाच्या मांगरात जुगाराचे पाल टाकले गेले आहेत. “बाईतला” “तो” कणकवलीचा डॅडी जुगाराचा मुख्य सूत्रधार असून गाळवणच्या मंदीपने जुगारासाठी कसाल येथील सुरक्षित जागा शोधली असून त्याचा मोबदला देखील घेतला आहे. बैठकीची जागा गुप्त असल्याने जुगाराच्या खेळींना पोचविण्यासाठी कसाल येथे एक माणूस उभा करून ठेवला आहे.

जुगाराच्या जागा बदलतात परंतु पोलिसांना जुगारावर कारवाई करता येत नाही…याचे नक्की कारण काय…? खाकी वर्दीचा आंतरिक संबंधच जुगाराची पाठराखण करतो की काय…?

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − six =