You are currently viewing “ज्यांच्या नावातच इंद्र” असे चेंदवणचे सुपुत्र देवेंद्र नाईक वाढदिवस अभिष्टचिंतन

“ज्यांच्या नावातच इंद्र” असे चेंदवणचे सुपुत्र देवेंद्र नाईक वाढदिवस अभिष्टचिंतन

 

मनात प्रबळ इच्छा असेल तर माणूस यशाचे शिखर देखील सहज सर करू शकतो… असेच कठोर परिश्रम आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर केवळ स्वतः पुरते मर्यादित न राहता आपले आयुष्य समाजातील इतर घटकांसाठी वाहणारे कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावचे सुपुत्र देवेंद्र मोरेश्वर नाईक यांचा आज वाढदिवस…!

घरातून झालेले संस्कार आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून निर्माण झालेली समाजसेवेची आवड….. नेहमीच माणसाला दुसऱ्यांच्या हृदयावर राज्य करण्याची संधी मिळवून देते. लोकांच्या मनावर राज्य करणारी व्यक्तीचं समाजातील प्रतिष्ठेची पदे भूषविते याचाच प्रत्यय येतो तो चेंदवण गावचे सरपंच पद आपल्या सामाजिक कार्यामुळे प्राप्त करणारे देवेंद्र नाईक यांच्याकडे पाहिल्यावर…! आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत असतानाच देवेंद्र यांनी चेंदवणच्या “फ्रेंडशिप” क्रिकेट संघाला वेगळी ओळख प्राप्त करून दिली. जिल्हाभरातील क्रिकेट स्पर्धांमध्ये “फ्रेंडशिप चेंदवण” हा संघ समोर खेळत असला की धडकी भरायची, एवढी ओळख निर्माण केलेली ती देवेंद्र नाईक यांनीच..! देवेंद्र यांनी गावातील खेळाडूंना एक वेगळी ओळख देत क्रिकेटच्या जगतात जिल्ह्यात दबदबा निर्माण केला आहे. जिथे देवेंद्र तिथे विजय असेच समीकरण तयार झाले आहे.

संघाबाहेर बसूनही देवेंद्र यांनी फ्रेंडशिप चेंदवण संघाला जिल्हा बरोबर महाराष्ट्रात देखील नावलौकीक मिळवून दिला आहे. अशा या तरुण तडफदार नेतृत्वाला संवाद मीडिया कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 13 =