You are currently viewing लोककलावंतांचा कुणी वाली आहे का?

लोककलावंतांचा कुणी वाली आहे का?

आज कोविड 19 मुळे या सिंधुदुर्गचा या लाल मातीतील कलाकार आणि त्याची कला देशोधडीला लागली आहे खूप बिकट परिस्थिती आज सर्व लोककलाकारांवर येऊन ठेपली आहे,मंडपात एका बाकावर भरणारा दशावतार राजाचा दरबार आज हरवला आहे, भजन डबलबारी सामन्याला होणारी रसिकांची प्रचंड गर्दी, मंदिरात तसेच सार्वजनिक उत्सवात होणारे विविध कलात्मक सांस्कृतिक संगीत कार्यक्रम बंद झाले आहेत आणि यामुळेच दोनवेळचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ही चिंता प्रत्येक कलाकाराला आज सतावते आहे.

आपल्या कलेतून लोकांचे मनोरंजन करता करता त्यासाठी मात्र आज कुणी वाली नाही अशी आज परिस्थिती झाली आहे या आलेल्या महामारीत कलाकार पार चिरडून गेलाय संगीत क्षेत्रातील सिंधुदुर्गचे पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांनी बोलताना सांगितले की आपल्याप्रमाणे बरेच कलाकार हे आपल्या कलेतून आपला उदरनिर्वाह करत होते.  विविध ठिकाणी जाऊन संगीत कला सिंधुदुर्ग नव्हे तर गोवा रत्नागिरी, मुंबई या ठिकाणी जाऊन सुद्धा आपल्या संगीत कलेचे ज्ञानदान करत होते आणि यातून चांगले कलाकार त्यांनी सिंधुदुर्ग ला तसेच इतर ठिकाणी मिळवून दिलेत बरीच नावे आहेत,विशारद,अलंकार पदवी प्राप्त आज सिंधुदुर्गला कलाकार देण्यात बऱ्याच संगीत शिक्षकांनी खूप मोठे योगदान सिंधुदुर्गला दिले आहे,

संगीत क्षेत्रात ती नावे लिहायला सुद्धा हजारो पाने लागतील असे कलाकार सर्व संगीत शिक्षकांनी घडविलेले आहेत व या आपल्या कलेतूनच आपला उदरनिर्वाह करणारी बरीच मंडळी आज सिंधुदुर्गात आहेत कधी त्यांना कुणाचा राजाश्रय मिळाला नाही स्वतःच्या हातातून कलेद्वारे मिळणाऱ्या मानधनातून आपले कुटुंब चालवत होते त्यासाठी बऱ्याच जणांनी प्रवासासाठी कर्जाची वाहने सुद्धा घेतली आहेत, रोजचा घरखर्च, लाईटबिल, घराचे हफ्ते हे शिवाय इतर खर्च हा रोजचा आहेत त्यात कसे जगायचे हा मोठा प्रश्न प्रत्येक कलाकाराला आज भेडसावतो आहे,संगीत कलाकार, भजनी बुवा, गायक वादक, तसेच कोकणची दशावतारलोककला सर्वच कलाकार आज मोठ्या संकटात सापडले आहेत तरी याचा विचार गांभीर्याने शासनाने, लोकप्रतिनिधीनी, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दातृत्व लोकांनी करावा आणि लोककलावंतांना या संकटातून वाचवावे ही कळकळीची विनंती आज कलाकार जगला तर कला जिवंत राहील हे नक्कीच

सिंधुदुर्ग पखवाज अलंकार श्री महेश सावंत, कुडाळ

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =