You are currently viewing जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा उद्या वेंगुर्लेत…

जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा उद्या वेंगुर्लेत…

वेंगुर्ले

कुमार/ कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा उद्या १३ नोव्हेंबरला सकाळी ९ ते सांय. ५ या वेळेत खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला हायस्कूलच्या मैदानावर घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.


सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व वेंगुर्ला तालुका कबड्डी असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कुमार / कुमारी संघ निवडला जाणार असून , निवडलेले दोन्ही संघ ३ ते ६ डिंसेबर २०२२ या कालावधीत परभणी येथे होणाऱ्या ४९ व्या कुमार / कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर याच राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा सकाळी ९:०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत बाद पदधतीत खेळविण्यात येणार असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघानी तालुका कबड्डी असोसिएशन च्या शिफारशीने जिल्हा संघटनेकडे आपल्या संघाची नोंद व खेळाडू संलग्नता करावयाची आहे.

प्रत्येक तालुका कबड्डी असोसिएशन ने याकरीता विशेष लक्ष द्यावा.
सदर संलग्नता किंवा संघ नोंदणी ही फक्त कुमार गट संघासाठी नसून प्रत्येक संघाने आपल्या किशोर ,कुमार व खुला गट खेळाडूंची एकत्र करून संघ नोंदणी करावयाची आहे. सदर नोंदणी ही सन २०२२- २३ करिता असून जिल्ह्यात होणाऱ्या सर्व स्पर्धां करिता कायम राहणार आहे. संघ नोंदणी झाल्या नंतर त्यापैकी कुमार कुमारी गट खेळाडूंचा संघ वेगळ्या फॉर्मवर भरून १३ नोव्हेंबर रोजी कुमार/ कुमारी स्पर्धेकरिता खर्डेकर हायस्कूल वेंगुर्ला येथे संघासोबत आणावयाचा आहे. या अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये विजयी, उपविजयी व तृतीय क्रमांक मिळालेल्या संघाना विविध नोकर भरती प्रक्रिये करीता हे जिल्हाचे प्रमाणपत्र उपयुक्त ठरणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी खेळाडूंना सदर जिल्हा प्रमाणपत्र शालेय गुणांकरिता उपयुक्त ठरणार आहे. जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छीणाऱ्या कुमार गट मुलगे वजन ७० किलो व कुमारी गट मुली वजन ६५ किलो तर दोन्ही गटासाठी वयोमयीदा २० वर्षांखालील ( जन्मतारीख 01/01/2003 व त्यानंतर जन्मलेले) ग्राह्य धरली जाणार आहे. जन्मतारीख निश्चित करण्यासाठी एक पुरावा सादर करणे अनिवार्य आहे.


अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे सहकार्यवाह सहकार्यवाह श्री. तुषार साळगावकर 9404512384, 9420258800 यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा