मालवण :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुगार हा कायदेशीर धंदा असल्यासारखा सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे होणारे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे जिल्ह्यातील खाकी वर्दीचे शिलेदार जिल्ह्यात सुरू असलेल्या जुगार या अवैध्य व्यवसायाला संरक्षण देत असल्यामुळेच गावागावात जुगाराचे पेव फुटले आहे आणि कित्येक लोकांचे संसार जुगारात दाग दागिने पैसे हरल्यामुळे उध्वस्त होत आहेत.
मालवण तालुक्यातील ओवळीये जंगलात सुरू असलेल्या जुगाराची तक्षिम “रामाचा आत्मा” असलेला गवंडे “बाई” मध्ये असलेला “तो” आणि “बांदा” येथील “कर” घेणारा एक इसम अशा तिघांची आहे. यात बांदा येथील कर घेणाऱ्याची ५०% हिस्सेदारी आहे. गाळवणकरांचा कुलदीप हा टाकी वर्दीच्या शिलेदाराची बडदास्त ठेवतो त्यासाठी त्याला एक हजार रुपये बक्षीस दिली जाते. एकंदरीत खाकी वर्दीचा बंदोबस्त झाला की जुगाराचे फड गावोगावी बसतात. काल रात्री कणकवली पासून तीन किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या जुगाराच्या मैफिलीमध्ये बिर्याणी वरून जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे जुगाराची मैफिल अर्ध्यावरच बंद पडली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले जुगार म्हणजे भविष्यात तरुणाईच्या बरबादीकडे जाणारी वाट…! त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तरुण तडफदार पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी अवैधरित्या सुरू असलेले जुगाराचे धंदे जिल्ह्यातून हद्दपार करावे. अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होऊ लागली आहे.