You are currently viewing कवयित्री उज्ज्वला कोल्हे यांना माणूसकी सेवा गौरव आणिकाव्य रत्न पुरस्कार प्रदान

कवयित्री उज्ज्वला कोल्हे यांना माणूसकी सेवा गौरव आणिकाव्य रत्न पुरस्कार प्रदान

नासिक / (प्रतिनिधी) :

कवयित्री उज्ज्वला बाळासाहेब कोल्हे यांना दि.२६फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथे भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाऊंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता)संरक्षण समिती राष्ट्रीय माणुसकी सेवा गौरव पुरस्कार २०२४ जागो ग्राहक जागो संस्थेद्वारे ‘काव्य रत्न’ पुरस्कार उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

मा.उत्तम कांबळे (जेष्ठ साहित्यिक व माजी संपादक, सकाळ वृत्तपत्र) मा.अशोकजी अव्हाड (माजी न्यायाधीश) मा.चंद्रकांतजी खांडवी (पोलीस उपायुक्त,नाशिक) मा. प्रशांत बच्छाव (पोलीस उप आयुक्त नाशिक) मा.आदिती गायकवाड (अध्यक्षा महाराष्ट्र राज्य) मा.प्रकाशजी लोंढें (नगरसेवक तथा आर पी आय जिल्हाप्रमुख) मा. मनिषजी सानप (सहायक आयुक्त, अन्न प्रशासन विभाग, नाशिक) मा.जितेंद्र निकाळे (नाशिक जिल्हा कायदेशीर सल्लागार) मा डाॅ. अविनाश झोटींग(राष्ट्रीय सचिव) मा.दादासाहेब केदारे (राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यांच्या अनेक काव्यांजली काव्य प्रकारातल्या रचना प्रसिद्ध आहेत. तसेच अनेक साहित्यिकांनी ह्या काव्य प्रकाराला पसंती देऊन पाहता पाहता हा काव्यप्रकार खूपच लोकप्रिय ठरला आहे. उज्ज्वला कोल्हे यांचे लिखाण अगदी वास्तविक व मनाला भिडणारे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 13 =