You are currently viewing वराड येथे माजी खास. निलेश राणे यांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीनचे वाटप

वराड येथे माजी खास. निलेश राणे यांच्या हस्ते महिलांना शिलाई मशीनचे वाटप

मालवण :

 

मालवण तालुक्यातील भाग्यश्री महिला मंडळ वराड या संस्थेकडून गरजू महिलांकरिता शिलाई मशीन वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी निलेश राणे यांचे अध्यक्ष माधुरी मसुरकर यांनी पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर सावंत यांनी केले. या कार्यक्रमात आनंद शिरवलकर, आशिष हडकर, जि. प. माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, हरिश्चंद्र परब, भाग्यश्री महिला मंडळ अध्यक्ष माधुरी मोहन मसुरकर, उपाध्यक्ष आरती घाडी, सचिव अनिता परब आणि वराड ग्रामस्थ उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + nineteen =