लवकरच नेतेही अडकणार शिवबंधनात :- रुपेश राऊळ तालुकाप्रमुख सावंतवाडी यांचे सूतोवाच
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेला चांगले दिवस आले आहेत. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांच्या सरकारमध्ये समन्वय साधत उद्धव ठाकरे यांनी अतिशय शांत, संयमी राहत उत्तमरीत्या चालविलेला सरकारचा गाढा पाहता उद्धव ठाकरे यांच्यामधील उत्कृष्ट नेतृत्वाची झलक दिसून आली. कोरोनाच्या काळातही विरोधकांचे वार देखील त्यांनी लीलया परतवून लावत राज्याला स्थिर सरकार दिले. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सावंतवाडी तालुक्यातील ५/६ गावातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशी माहिती शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली.
कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर काहीच दिवसात त्यांचे नेते देखील शिवबंधन बांधून शिवसेनेतून एक नवी इनिंग सुरू करणार आहेत. असेही त्यांनी सूतोवाच केले. सावंतवाडी तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे अनेकजण शिवसेना प्रवेशासाठी उत्सुक आहेत. नजीकच्या काळात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असून कार्यकर्ते आणि नेते यांचे पक्षप्रवेश हे त्याचाच एक भाग असेल.
रुपेश राऊळ यांच्या वक्तव्यानंतर कोणत्या पक्षाचे नेते आणि कोणकोणत्या गावातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिवसेनावासी होणार हे मात्र गुलदस्त्यात राहिले आहे. लवकरच कोण कोणाला निरोप देणार आणि काय पदरात पाडून घेणार हे समजून येईलच…