You are currently viewing कोरोना रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी कोव्हिड सेंटर मध्ये अंडी वाटप..

कोरोना रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी कोव्हिड सेंटर मध्ये अंडी वाटप..

प. स. सदस्य व शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांचा उपक्रम

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सकस व पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. तालुक्याच्या कोव्हिड सेंटर मधील रुग्णांना अश्याप्रकारचा आहार मिळावा यासाठी दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख व प स सदस्य बाबुराव धुरी यांनी रुग्णांना आज पासून अंडी वाटप सुरू केले, ज्येष्ठ शिक्षक केंद्रप्रमुख गुरुदास कुबल हेही यावेळी उपस्थित होते. आज पासून अंडी वाटपाचा हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचा धुरी यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × three =