You are currently viewing सिंधुदुर्ग श्री 2023″ शरीर सौष्ठव स्पर्धा फोंडाघाट मध्ये 22 जानेवारीला

सिंधुदुर्ग श्री 2023″ शरीर सौष्ठव स्पर्धा फोंडाघाट मध्ये 22 जानेवारीला

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केले आवाहन

फोंडाघाट

महाराष्ट्र बॉडीबिल्डर असोसिएशन यांच्या मान्यतेने फ्युचर फिट जिम आयोजित जिल्हास्तरीय “सिंधुदुर्ग श्री 2023” ही शरीरसौष्टव व मेन फिजिक्स स्पर्धा २२ जानेवारी 2023 ला राधाकृष्ण मंगल कार्यालय, एस. टी स्टँड फोंडाघाट या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व जिम ओनर्स व स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

एकूण रोख पारितोषिक रु.१,४०,००० इतकी असणार आहे. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्ह्यातील बॉडी बिल्डर्स स्पर्धकांना केले आहे. ही संधी जिल्हावासीयांना फोंडाघाट मध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल फ्युचर फिटचे अमीत कदम यांचे अजित नाडकर्णी यांनी आभार व्यक्त केले आहेत.
सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी खालील नंबर वर संपर्क साधावा.
संपर्क – सौरभ ७६६६८४७५११, राज ७७७५८३७७१०

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 8 =