*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.संगीता माने लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्द*
शब्दच ते
हसवायचे कधी रडवायचे
मोडायचे नी घडवायचे यव
वेचक अक्षरांचा
बनणारा शब्द
कधी करतो स्तब्ध
कधी करतो लुब्ध
शब्द खरच बाण असतो
काळजाला चिरणारा
हयातभर सलणारा
रूतणारा बोचणारा
जाणिवांना ठेचणारा
तरीही त्याच्यावर
पडत नाही बंदी
चांगली वाईट
घडवीतात संधी
प्रेमातले शब्द म्हणजे
मधाचे पोळ
स्तुतीपर शब्द
कोळ्याचे जाळे
शब्द ते
हवेहवेसे नकोनकोसे
कधी वाटती हायसे
तर कधी
सोडायला लावती उसासे
शब्दांच काय
ते तर आपल्या
भावनांचे करती प्रतिनिधित्व
कधी मांडती तत्व
तर कधी मिटवती स्वत्व
नका देवू शब्दांना दोष
उगा नको त्यांच्यावर रोष
भावनांना लावा लगाम
शब्द नाही सुटणार
तेव्हा बेफाम
शब्द शब्द शब्द
*सौ संगीता माने*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*