You are currently viewing ओझर येथे आंबा बागेत आग लागून मोठे नुकसान

ओझर येथे आंबा बागेत आग लागून मोठे नुकसान

मालवण

मालवण देवगड मार्गावरील ओझर येथे जगदीश गांवकर यांच्या आंबा कलम बागेत सोमवारी दुपारी मोठी आग लागली. स्थानिक ग्रामस्थ, मित्रपरिवार मालवण नगरपरिषद अग्निशमन यंत्रणा दाखल झाली. उशिरा भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र ऐन आंबा हंगामात लागलेल्या या आगीमुळे जगदीश गांवकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. आप्पा लुडबे, आदू गांवकर, केदार गांवकर व अन्य सहकारी यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =