You are currently viewing आंबोली घाटात चिरे वाहतुक करणारा ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू

आंबोली घाटात चिरे वाहतुक करणारा ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू

सावंतवाडी :

 

आंबोली घाटात मुख्य दरडीच्या ठिकाणी चिरे वाहतुक करणारा ट्रक दिड हजार फूट खोल दरीत कोसळून चालक शंकर मनोहर पाटील वय २८ रा. नंदगड जि. बेळगांव याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या बाबतची माहीती सदया घाटात दरडीसाठी जाळी लावत असणाऱ्या कामगारांनी रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीसांना दिली.

मयत शंकर मनोहर पाटील हे बसू नाईक यांच्या मालकीच्या ट्रकने नेहमीच मालवण ते बेळगांव असे चिरे वाहतुक करीत असत नेहमी प्रमाणे ते शनिवारी रात्री मालवण येथून चिरे भरून रात्रौ ऊशीरा मालवण येथून सुटून रवीवारी पहाटेच्या सुमारास आंबोली घाटात आले त्यांना कदाचित झोप अनावर झाली अथवा समोरुन येणाऱ्या गाडीची प्रखर लाईट पडली की जेणे करून घाटात बेळगावच्या दिशेने येणारा ट्रक सरळ खाली गेला. ट्रक पडल्या नंतर थोडाफार दिसत होता त्यामुळे माहीती मिळाली अन्यथा माहीती मिळणे अवघड होते. आंबोली घाटात धोकादायक दरडींच्या ठिकाणी जाळी लावण्याचे काम गेले महीना भर सुरु असून त्या निमित्ताने हे कामगार आंबोली येथून दररोज घाटात ये जा करीत असतात त्यामुळे त्यांना हा रस्ता, संरक्षक कटडे माहीत झाले आहेत.

सोमवारी सकाळी हे कामगार कामावर येत असताना त्यांना मुख्य दरडीच्या खाली आंबोली पासून सावंतवाडी च्या दिशेने साडेचार कि.मी. अंतरावर घाटाच्या बाजुने कटडा तुटलेला दिसला त्यामुळे त्यांनी खाली वाकून पाहीले तर त्यांना ट्रक खाली दिसला त्यांनी लागलीच ही बातमी आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे ठाणे अंमलदार हवालदार दत्तात्रय देसाई यांना सांगितली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता सोबतीला पो. कॉ. राजेश नाईक यांना घेऊन घटना स्थळी जाऊन खात्री केली. आणि वरीष्ठांना संबधीत घटनेची माहीती दिली. त्यानंतर रेस्क्यू टीम च्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 1 =