You are currently viewing माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ता श्री.उमाकांत वारंग वाढदिवस अभिष्टचिंतन

माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ता श्री.उमाकांत वारंग वाढदिवस अभिष्टचिंतन

*माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ता श्री.उमाकांत वारंग वाढदिवस अभिष्टचिंतन*

सावंतवाडी नगरपालिकेतील माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांचा आज वाढदिवस. सावंतवाडी नगरीच्या मागील जवळपास 30-40 वर्षाच्या कालावधीत सामाजिक कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी म्हणून प्रामुख्याने ज्यांचं नाव घेतलं जाईल असे नाव म्हणजे सावंतवाडी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग…!


सावंतवाडीच्या नगरपालिकेतील नगरसेवक म्हणून कार्यरत असताना नगरसेवक ते उपनगराध्यक्ष असा त्यांचा चढता कार्यकाळ राहिला आहे. त्याचप्रमाणे पालिकेतील सर्व सभापती पदे आपल्या कारकिर्दीत भूषवलेले व तब्बल सहा वेळा सावंतवाडी नगरीचे नगरसेवक म्हणून कारकीर्द गाजविलेले नगरसेवक म्हणून उमाकांत वारंग यांचे नाव नक्कीच घेतले जाईल. सावंतवाडी शहरातील सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उमाकांत वारंग यांनी उल्लेखनीय असे कार्य केले आहे सावंतवाडी नगरीतील सावंतवाडी महोत्सव यामध्ये देखील त्यांनी केलेले भाग घेत महोत्सव यशस्वी करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे शहरात आरोग्य शिबिर असो अथवा सामाजिक उपक्रम उमाकांत वारंग नेहमीच अग्रेसर असतात गेली अनेक वर्ष ते सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत असून सावंतवाडी पतपेढी, सावंतवाडी अर्बन बँक, सावंतवाडी कन्झुमर्स सोसायटीचे देखील ते संचालक आहेत. केवळ राजकारण म्हणून राजकारण न करता समाजकारणातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. खास्कीलवाडा येथील वटसावित्री क्रीडा मंडळाचे ते अनेक वर्षे कार्यकर्ते असून खासकिलवाड्यातील विकासकामांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सांस्कृतिक चळवळीत नेहमीच सक्रिय असणाऱ्या उमाकांत वारंग यांचा आज वाढदिवस….! *संवाद मीडियाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =